इंदापूर प्रतिनिधी-
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. महात्मा फुलेनगर बिजवडी ता. इंदापूर जिल्हा पुणे या कारखान्याने या वर्षी 2021- 22 चा ऊस लागवड हंगाम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु:, पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरू झाल्याची माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते तसेच या कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांनी दिली असून तसे परिपत्रक कारखान्याने काढले आहे.
सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांना या द्वारे कळविण्यात येत आहे की ऊस लागवड हंगाम 2021- 22 लागवड होणाऱ्या उसाचे वेळेत गळीत होण्यासाठी व एकरी ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने माननीय संचालक मंडळाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार ऊस लागवड हंगाम धोरण राबवले असून सभासदाने ऊस लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. सभासदांनी ऊस लागण करतेवेळी नऊ ते दहा महिने वयाचे ऊस बेणे वापरावे, ऊस लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सभासदाने ऊस लागवड करतेवेळी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याने तयार केलेल्या कर्मयोगी सेंद्रिय खत व कर्मयोगी जिवाणू खताचा वापर करावा असेही आवाहन यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले, कार्यकारी संचालक देवराव लोकरे आणि संचालक मंडळाने केले आहे.
टिप्पण्या