इंदापूर:- येथील उपजिल्हा रूग्णालयात 6 ते 8 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करत आहे त्यांचे पगार हे नियमित होत नाहीत हे कामगार सांगेल ते काम दवाखान्यात करतात आणि पेशंटला सहकार्य करतात करोना काळात सर्वात जास्त काम या कर्मचारी वर्गाने केले त्या काळात त्यांना ही पेमेंट वाढवून द्यायला हवा होता अशा वेळेस कोणी काम करत नाही त्या करोनाच्या काळात ही त्यांनी कामे केली . या सर्व कंत्राटी कामगारांना सद्या 7 हजार रुपये मासिक ( महिना ) पगार पडतो या पगार मध्ये त्यांचा प्रपंचाही भागात नाही त्यांना ही पेमेंट वाढले पाहिजे,आसे मत प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप यांनी व्यक्त केले, ते म्हणाले की त्यांचे पेमेंट वाढत नाही याचे कारण तेथे काँन्ट्रक्टर नाही या कामगारांचे पगार सरकारी दवाखान्याच्या डिपार्टमेंट मार्फत आरोग्य जनकल्याण या संस्थेमार्फत काढले जाते असे समजते . त्यांचे पेमेंट वाढण्यासाठी त्यांचे टेंडर निघाले पाहिजेत टेंडर निघाल्याने पेमेंट वाढू शकते व पेमेंट वेळेनुसार होऊ शकते असे आम्हाला वाटते . टेंडर का काढत नाहीत यात संशयास्पद वाटते कित्येक दिवस हे कामगार 7 हजार रुपये मध्ये काम करणार ?
भविष्यात टेंडर काढावे व गोरगरीब कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा दिला पाहिजे असेही पवार म्हणाले,
प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार काढावेत .
भविष्यात टेंडर पदधत काढावी नाही तर
अन्यथा आंदोलन केले जाईल .आसेही मत पवार यांनी व्यक्त केले
ते पुढे म्हणाले की
2 वर्षापासून इंदापूरला अधिक्षक नाही सध्या डॉ.एकनाथ चंदनशिवे हे काम पाहत होते मात्र ते सेवानिवृत्त होणार होते म्हणून डॉ.सुहास शेळके यांनी पदभार स्वीकारला आहे.त्यांचे काम चांगले आहे. परंतु जे डॉक्टर सरकारी दवाखान्यात कामावर आहेत त्यांची स्वतःची opd नसावी मग ते opd कशी चालवतात त्या दवारवान्यात टेंडर पद्धत नाही मग टेंडर भरती कोणी केली टेंडर कोणाच्या नावाने आहे ते असेल तर ११ महिन्याचे टेंडर असायला हवे त्यांचे पगार अंदाजे कसे काढले जातात किती कामगार टेंडर मध्ये आहेत व किती लोकांचे वाढऊन बिले काढली जातात हा प्रकार उघडकीस येणे महत्त्वाचे आहे, इंदापूरातील जे डॉक्टर कामावर आहेत ते डॉक्टर पुर्ण वेळ काम करत नाही त्यांना सतत फोन करून बोलवावे लागते तो पर्यंत पेशंटचे खूप हाल होतात काहीना मृत्यु पत्कारावा लागतो इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालय हे चांगले आहे मात्र वरिष्ट पातळीवर न लक्ष घातले पाहिजे ...
कामगारांचे पगार त्वरित द्या, अन्यथा आंदोलन केले जाईल आसा इशारा प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप इंदापूर यांनी दिला आहे,
टिप्पण्या