परमेश्वराच्या दारात कानातील हरवलं,पण साधुसंतांची सेवा करताना देव तुला यापेक्षा चांगलं देईल.मुलीच्या कानातील सुवर्णाभूषण साठी मदत गोळा,
जवळजवळ आठ हजाराचं नुकसान झालेला असताना जय इन्स्टिट्यूटच्या नर्सिंग कॉलेजच्या मुलींनी आपली सेवा थांबवली नाही जिथे कानातला हरवलंय तिथे शोधाशोध केली आणि पुन्हा संत चरण सेवा सुरू ठेवली स्वतः दुःखात असताना नुकसान झालेला असताना या जयश्री दुपडे या नर्सने हसतमुखाने वारकरी माता-भगिनींची सेवा चालू ठेवली तिच्या या सेवाभावी वृत्तीच कुठेतरी चीज व्हावं आणि करभला सोहला हो भला या उक्तीप्रमाणे युवा क्रांती प्रतिष्ठानचे अस्लम शेख यांनी पुढाकार घेऊन 501 रुपयाची मदत प्रशांत शिताप याना सपूर्द करून मदतीचे आवाहन करायची विनंती केली.
एक व्हॉटसअप ग्रुप एक आव्हान..आणि एका दिवसात त्या मुलीच्या कानातील सुवर्णाभूषण साठी मदत गोळा झाली
आज दिनांक 15/07/24 रोजी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज वर जाऊन युवा क्रांती प्रतिष्ठान चे धरमचद लोढा मोरेश्वर कोकरे हामिदभाई आत्तार चंद्रकांत देवकर सौ लता जयंत नाईकुडे आणि संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांनी कानातील सोन्याचे आभूषण गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देवून मुलींच्या सेवा भावी वृत्तीचे कौतुक केले
या वेळी प्रशांत शिताप यांनी कॉलेज मधील मुलींना संबोधित केले की प्रामाणिक पाने आणि हसतमुखाने ज्या वेळेस तुम्ही कर्तव्य पार पाडता ते सेवा भावी वृत्तीच कार्य तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सन्मानित करत.
या कार्यात मदत केलेल्या सर्व सहकारी मित्रांचे आभारसेवा परमो धरमप्रशांत उषा भानुदास शिताप युवा क्रांती प्रतिष्ठान
टिप्पण्या