मुख्य सामग्रीवर वगळा

भविष्यात अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून इंदापूरची ओळख निर्माण व्हावी,अभ्यासिकेसाठी 25 लाखांचा निधी देणार-आ.दत्तात्रय भरणे

इंदापूर:- तालुक्यातील अनेक विभूतींनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उतुंग कामगिरी करून आपल्या इंदापूर तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या क्षितिजावर गाजविले असून राजकारण,समाजकारण,शेती,कला,क्रीडा,साहित्य,उद्योग,सहकार आदी क्षेत्रामध्ये इंदापूरची आगळीवेगळी छाप पडलेली असताना अलीकडच्या काळात यामध्ये अधिकाऱ्यांची भर पडली असून आपल्या खेडोपाड्यातील अनेक शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे.
 महाराष्ट्र असेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या विविध परीक्षांमध्ये अनेक तरुण तरुणींनी घवघवीत यश संपादन केले आहे,या गुणवंतांचा आपल्या तालुकावासियांना रास्त अभिमान असून येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून इंदापूरची ओळख निर्माण झाली पाहिजे,अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
काटी येथील भरतवाडी ग्रीन फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परिक्षेत चमकलेल्या श्री.अमोल रामचंद्र मोहिते (पोलिस उपअधिक्षक ),श्री.दत्तात्रय सुभाष पाटील (सहकार अधिकारी ) तसेच श्री.शिवाजी भारत दोलतोडे(मंत्रालयीन क्लार्क) यांचा सत्कार समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता,या प्रसंगी आ.भरणे बोलत होते.
ते म्हणाले की,खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व शेतीपूरक व्यवसायावर उपजीविका करत आहे.त्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण मनामध्ये ठेवून अनेक मेहनती मुले कोणत्याही खाजगी शिकवण्या न लावता दिवस-रात्र स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करत आहे.याचा मनस्वी आनंद सर्वांना असल्याचे सांगत आमदार भरणे म्हणाले पुढे म्हणाले की,मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ग्रामीण भागातील तरूणांना गावातच वाचनाचे साहित्य तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत,या भावनेतून सबंध जिल्हाभर शाह-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले होते.याच धर्तीवर अंथुर्णे येथे सुसज्ज वाचनालयाची स्थापना केली असुन या ठिकाणी हजारो तरूण लाभ घेत आहेत.तर शेकडो मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आघाडी सरकारमध्ये सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना या कालखंडामध्ये विद्यार्थी हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो तरुणांना याचा फायदा होऊन आज शासनाच्या विविध विभागांमध्ये अनेक अधिकारी आपलं कर्तव्य बजावत जनतेची सेवा करत असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 त्याच बरोबर अलीकडच्या काळात काटी व काटी परिसरातील अनेक तरुण मुला-मुलींनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवल्याची माहिती उपस्थितांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काटी येथे वाचनालय उभारण्यासाठी २५ लक्ष निधीची घोषणा करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,मार्केट कमिटीचे माजी संचालक साहेबराव मोहिते,युवा नेते हेमंत पाटील,सरपंच अमित मोहिते तसेच ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...