मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज

इंदापूर तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल 19 कोटी 45 लाखआमदार दत्तात्रय भरणे
इंदापूर 
 माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 योजनेतून तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी तब्बल 19 कोटी 45 लाख मंजूर झाले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे.मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार भरणे यांनी कोट्यावधी रूपये आणले होते.त्यानंतर लगेचच तीन महिन्याच्या आतच अजून आठ रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मात्र भरणे यांच्या चिकाटीमुळे मार्गी लागणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील एकूण आठ कामांकरिता 20 किलोमीटर ची लांबी मिळालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच दिवसांपासून या रस्त्यांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील होते.
1)रामा 120 जांब ते छत्रपती हायस्कूल मानकरवाडी रस्ता लांबी 3.200 किमी
रक्कम 3 कोटी 22 लाख २.हिरेमठवस्ती नगरे मळा प्रजिमा-194 ते उंडेवस्ती बेलवाडी विद्यालय रस्ता लांबी 1.900 किमी रक्कम 1कोटी 72 लाख 3) रामा 132 काझड ते बाबुराव पाटील नंदिवाले वस्ती ते वडाचा मळा रस्ता लांबी 3.600 किमी रक्कम 2 कोटी 68 लाख4)रामा 124 जंक्शन ते रुपनवर वस्ती आठदारे रस्ता लांबी 1.900 किमी रक्कम 1 कोटी 80 लाख5)रामा 65 ते कुताळवाडी ते भाग्यनगर रस्ता लांबी 1.600किमी
रक्कम 1कोटी 33 लाख6)प्रजिमा 125 शिरसोडी खामगळ वस्ती रस्ता लांबी 2.200 किमी रक्कम 2 कोटी 67 लाख
7)प्रजिमा 159 रामकुंड ते अभंगवस्ती ते झगडेवाडी रस्ता लांबी 2.800 किमी
रक्कम 3 कोटी 46 लाख
8)काटी ते जाधववस्ती रस्ता लांबी 2.800 किमी रक्कम 2 कोटी 53 लाख
या विषयी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो.आजपर्यंत आपण तालुक्यासाठी हजारो कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत.विकासाची हिच गती चालू असून या रस्त्यांमुळे नागरिकांचे दळणवळण अजून सुलभ होणार असुन लवकरात लवकर सदरील कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...