सौभाग्य होलसेल साडी आणि रेडिमेड डेपो' फलटण च्या कापड व्यवसायात नावीन्य आणून वैभवात भर :श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर
इंदापुर: फलटण तालुक्याच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक विकास होत असताना 'सौभाग्य होलसेल साडी आणि रेडिमेड डेपो' फलटण च्या कापड व्यवसायात नावीन्य आणून वैभवात भर पडेल असा विश्वास सातारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
रविवार दि.25 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमहूर्तावर' सौभाग्य होलसेल साडी आणि रेडिमेड डेपो'चा उदघाटन समारंभ फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या वेळी निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी फलटण -कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण,नगराध्यक्षा नीता नेवसे ,स्मिता राजेश खरात उपअध्यक्षा राष्ट्रवादी महिला आघाडी फलटण पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता आप्पासो भोसले,अशोकराव चव्हाण, गणपत कोकरे,राजेश खरात सौभाग्य चे संचालक राहुल चव्हाण साहेब ,विवेक भोसले,संतोष बांदल,अनिल कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बालकां पासून ते जेष्ठ व्यक्ती पर्यंत सर्वांचे कपडे,महिलांसाठी साड्या,ड्रेस मटेरियल,लग्न बस्ता साठी खास सोय उपलब्ध आहे देशातील सर्वच नामांकित कंपनीचे कपडे,साड्या उपलब्ध असून सर्व सामान्य याना परवडेल आशा किमती मध्ये उपलब्ध आहे त्याच प्रमाणे दिवाळी मध्ये प्रत्येक खरेदीवर खास आकर्षक भेट वस्तू ग्राहकांना मिळणार असल्याचे सौभाग्य होलसेल साडी अँड रेडिमेड डेपो च्या वतीने सांगण्यात आले.
--------------------------------------------------------
टिप्पण्या