महावितरण अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील लघु व मध्यम व्यावसायिकांनाही या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्यामुळे अनेक उद्योगधंदे व व्यावसायिक आस्थापना...
SHIVSRUSTHI NEWS