भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ सरसकट पंचनामे व मदतीची मागणी इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यात काल झालेल्या भीषण अवकाळी वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने केळी, डाळिंब, ऊस तसेच इतर भाजीपाला व फळबागांना या वादळाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, बावडा, टणू, गणेशवाडी, पिंपरी बु., लाखेवाडी, गिरवी या गावांमध्ये या वादळी पावसाने मुख्यत्वे थैमान घातले. अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. डाळिंब बागांचेही अतोनात नुकसान झाले असून काढणीस आलेला ऊस वाऱ्यामुळे आडवा झाला आहे. नेत्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी या भीषण परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व नेते प्रविण माने यांनी ...
SHIVSRUSTHI NEWS