इंदापूर कडक उन्हाळा असो वा वाढते प्रदूषण, इंदापूरकरांना आता त्याची फिकीर उरलेली नाही. "अतिक्रमण हटाव" पेक्षा "अतिक्रमण करूच नका" हा मंत्र जपत माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा, यांनी इंदापूरच्या मोकळ्या पण मोक्याच्या जागांचे थेट 'मिनी फॉरेस्ट'मध्ये रूपांतर केले आहे. त्यांना त्यांचे पती मा.मुकुंदशेठ शहा [ इंदापूरचे सयाजी शिंदे,] यांनी,मोलाची साथ दिली,घरचीच नर्सरी आसल्याने यांनी कोट्यावधी हून अधिक झाडांची,लागवड केली,अटल वन,ऑक्सिजन पार्क,इतर ठीकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून वनराई बहरली जनतेला आगळा वेगळा संदेश दिला.एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर झाडं मात्र शहा नर्सरीतीलच लावली जातात ,अकलूज रोड आणि टेंभुर्णी रोडवर फेरफटका मारला, तर तुम्हाला इंदापूर शहरात आहोत की महाबळेश्वरमध्ये, असा प्रश्न पडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, नेहमीच सिमेंटची जंगले वाढवण्याकडे कल असतो, पण अंकिताताईंनी मात्र 'घनदाट जंगल स्टाईल'वृक्षारोपण करून इंदापूरला एक नवी ओळख दिली आहे. ज्या मोकळ्या जागांवर उद्या टपऱ्या किंवा अनधिकृत बांधकामं होण्याच...
SHIVSRUSTHI NEWS