मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी हक्काचे व्यासपीठ: ‘केतकेश्वर सांस्कृतिक भवन’चा १३ वा वर्धापनदिन,

 इंदापूर निमगाव केतकी (प्रतिनिधी):गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच वरदान ठरणारे, निमगाव परिसरातील सर्व सोयींयुक्त व भव्य मंगल कार्यालय म्हणजेच केतकेश्वर सांस्कृतिक भवन’ या नामांकित कार्यालयाने आपल्या यशस्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त परिसरातून आणि विविध स्तरातून या कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणतीही मोठी गोष्ट ही एका छोट्याशा विचारातून आणि प्रामाणिक प्रयत्नातून जन्माला येते, याचाच प्रत्यय केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या प्रवासाकडे पाहताना येतो. तात्यासाहेब कोरटकर, मुख्तार मुलाणी आणि हरीशकुमार वाघमोडे या तिघांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी एका छोट्या रोपट्याच्या रूपाने या कार्यालयाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या अथांग परिश्रमातून, सचोटीतून आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या रोपट्याचा एक डेरेदार वटवृक्ष झाला आहे. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात, परंतु कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयी-सुविधा पुरवण्याचे काम केतकेश्वर सांस...

इंदापूर तालुक्यात 'आम सभाच घेतली नाही,; जनजीवन चा काळा बाजार उजेडात येऊ नये म्हणून लोकशाहीचा सोहळा की 'गुपचूप' कारभार..?

इंदापूर: आम सभा' म्हटलं की जनतेचे प्रश्न, अधिकाऱ्यांची पळापळ आणि लोकप्रतिनिधींचा कडकडाट... हे सगळं ऐकून-पाहून इंदापूर तालुक्यातील जनतेचे कान आणि डोळे आता पार थकलेत. कारण, तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून 'आम सभा' झालीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता इंदापूरकर विचारतायत "काय चाललंय राव..? तालुक्याच्या विकासाचा आणि जनतेच्या अडीअडचणींचा पाढा वाचण्यासाठी 'आम सभा' हे हक्काचं व्यासपीठ मानलं जातं. पण इंदापूर तालुक्यात मात्र या सभेला जणू 'अज्ञातवासा'त धाडण्यात आलं आहे. वर्ष सरली, ऋतू बदलले, अगदी नेते आणि अधिकारीही बदलले, पण बदलली नाही, तालुक्यात सध्या अशी चर्चा रंगली आहे की, आम सभा न घेण्यामागे नक्की काय गुपित आहे? लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटतेय, की प्रशासनाला उत्तरं देण्याची सोय वाटत नाहीये? रस्ते, पाणी आणि वीज,गावखेड्यातील पाण्याचे प्रश्न, रखडलेले रस्ते आणि विजेचा लपंडाव यावर बोलायचं कुणाकडे?आम सभाच होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विचारणारं कोणी नसल्याने 'आओ जावो घर तुम...

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव......

 इंदापूर महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्यावतीने काल इंदापूर येथे गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे भव्य दिव्य असा इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन आलेले क्रमांक यांचा ट्राफि, पुस्तक,प्रमाणपत्र, देऊन त्यांचा उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांची निवड करून अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.     यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून पुणे विभागीय मुख्याध्यापक संघ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रामभाऊ पाडोळे सर तसेच इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रमेश राऊत राष्ट्रवादी पार्टी मा.विरोधी पक्षनेत...

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाकडून ऊस (नियंत्रण) आदेशासंदर्भात विविध सूचना-हर्षवर्धन पाटील -पुणे येथे देशातील साखर कारखानदारांची बैठक

 इंदापूर  फोटो:-पुणे येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखानदारांची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात केंद्र सरकारला देशातील साखर कारखान्यांकडून आलेल्या सूचना दि. 20 मे पूर्वी सादर केल्या जाणार आहेत. या सूचनांमुळे कायदा अधिक व्यापक व सर्व समावेशक होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवीदिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.16) दिली.     पुणे येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची केंद्र सरकारच्या प्रस्तावित ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सविस्तर विचार मंथन करण्यात आले, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.        ते पुढे म्हणाले, सध्या केंद्र शासनाच्या ऊस (नियंत्रण) आदेश 1966 लागू आहे. गेल्या 40 वर्षात साखर व ऊर्जा क्षेत्रात झालेले संशोधन आणि सुधारणा यांचा अंतर्भाव करण्याच्...

इंदापूरमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास जागवणारा सांस्कृतिक सोहळा

महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था; शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनाने इंदापूरकर भारावले  इंदापूर शहराने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमच इंदापूरमध्ये सांस्कृतिक गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “शिवशंभो गर्जना” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास, संस्कृती, पराक्रम आणि शिवभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण इंदापूर शहर शिवमय झाले होते. प्रशांतमामा उंबरे युवा मंच, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील विस्तीर्ण परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभर गाजलेला “ABHI - AAMU LIVE FOLK MUSICAL” हा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच इंदापूरकरांच्या भेटीला आला होता. त्यामुळे कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळू लागली होती. या कार्यक्रमाला इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरतभाऊ शहा, शहा स्कूलचे विश्वस्त मुकुंदभाऊ शहा, माजी ...

जुन्या आठणींना उजाळा, ११ वर्षीय देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या खाऊन रचला होता विश्वविक्रम

इंदापूर;- (विशेष प्रतिनिधी) : राजकीय पटलावर आपल्या चाणाक्ष आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा एक अनोखा आणि रंजक इतिहास सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. तब्बल ४४ वर्षांपूर्वी, म्हणजेच १५ जून १९८२ रोजी प्रसिद्ध दैनिक 'तरूण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी एका खाण्याच्या स्पर्धेत तब्बल ३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप फस्त करून चक्क 'विश्वविक्रम' प्रस्थापित केला होता. नागपूरमधील रेशीमबाग भागात या भव्य पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तब्बल ९२ दिग्गज स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मात्र, अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकल्या देवेंद्र यांनी आपल्या अफाट खाण्याच्या क्षमतेच्या जोरावर सर्वांना मागे टाकत या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक:देवेंद्र फडणवीस (३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप) द्वितीय क्रमांक शैलेंद्...

“सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 इंदापूर:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.  यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने व प्रविणभैय्या माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी सहभाग, दूध प्रक्रिया व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती याबाबत विशेष समाधान व्यक्त केले. दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ, महिलांना रोजगाराच्या संधी आणि ग्...