गायीला 'राज्यमाता' दर्जा द्या; इंदापुरात तहसीलदारांना निवेदनराधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्टची मागणी; 'गो सन्मान आवाहन अभियाना'तंर्गत प्रशासनाला साकडे.
इंदापूर :संपूर्ण भारतात राबविल्या जाणाऱ्या 'गो सन्मान आवाहन अभियाना'च्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील **राधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्ट**च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. गायीला 'राज्यमाता' आणि 'राष्ट्रधरोहर' असा दर्जा देण्यात यावा, ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे. २७ एप्रिल हा दिवस 'गो सन्मान दिवस'** म्हणून साजरा करत असताना, देशभरातील गोप्रेमी आपल्या स्थानिक महसूल कार्यालयामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. याच अनुषंगाने हिंगणगाव येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष **श्री. नितीन मारुती आरडे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. गो सेवागायींच्या संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी गोशाळांना आवश्यक तो शासकीय निधी आणि अनुदान उपलब्ध करून द्यावे. गो सुरक्षा, संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर आणि एकसमान केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा. गो सन्मान गायीला केवळ प्राणी न मानता तिला 'राज्...