डाॅ.सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर, तालुका प्रतिनिधी, डॉ. संदेश शहा. प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला. त्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटवार यांनी केले. या आरोग्य केंद्राने १०० दिवसात लक्षवेधी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून या केंद्राचे विशेष पत्रा व्दारे अभिनंदन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगावच्या २०० कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा आयुष्मान आरोग्यदूत गौरव सोहळा इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. तत्पूर्वी समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन सुशोभीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण डोंगरे, देवराज जाध...