*माझा शेतकरी, युवा वर्ग, महिला ,कष्टकरी सुखी समृद्ध होऊ दे ,राज्यात जातीय धार्मिक सलोखा नांदू दे गणरायाच्या चरणी साकडे* ~अनिताताई खरात
इंदापूर:-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थी दिवशी इंदापूर शहरातील व परिसरातील अंदाजे 30ते 32 गणेश मंडळांच्या गणपतीला तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन गणेशाची पूजा करून मोत्याची माळ अर्पण केली, यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की आज गणेशाची पूजा करून माझ्या शेतकरी राजाला युवकांना महिलांना गोरगरीब कष्टकरी यांना सुखी समृद्ध ठेव तसेच राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना गुण्यागोविंदाने सलोख्याने राहण्याची बुद्धी दे, तसेच सर्व गणेश मित्र मंडळातील गणेश भक्तांना विनंती केली की आपण मिरवणूक काढत असताना आपल्यामुळे किंवा आपल्या डीजेच्या आवाजामुळे लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकना त्रास होणार नाहि किंवा गुलालाची उधळण करताना दुसऱ्याच्या डोळ्यांना इजा होऊन त्याचा वाईट परिणाम होऊ नये, मिरवणूक पाहण्यास आलेल्या महिलांचा व युवतींचा आपण सन्मान करावा तसेच मिरवणूक शांततेत व आनंदात पूर्ण करावी अशी विनंती सर्व मंडळांना करून आज बप्पाचे आशीर्वाद घेतले, यावेळी अनेक गणेश मंडळांनी तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे सद्दाम भाई बागवान ओंकार सुतार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते...
टिप्पण्या