प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देणे व प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प बसवा
इंदापूर:- मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांनी प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देणे व प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प बसवण्यात यावे. हे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी मा. स्वाती राऊत यांना देण्यात आले. विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या सुनबाई राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान वाढवावा अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी शिवमती प्रा. जयश्री गटकूळ, कल्पना भोर, रतन पाडुळे, हेमलता बोंद्रे, स्वाती रणसिंग, अॅड. पांडुरंग रायते, प्रमोद देशमुख, अमोल खराडे,
प्रमोद जगताप, उदयसिंह भोसले, राहुल साळुंखे, तुषार घोगरे उपस्थित होते.
टिप्पण्या