मुख्य सामग्रीवर वगळा

डाॅ.सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर, तालुका प्रतिनिधी, डॉ. संदेश शहा.
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला. त्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटवार यांनी केले. या आरोग्य केंद्राने १०० दिवसात लक्षवेधी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून या केंद्राचे विशेष पत्रा व्दारे अभिनंदन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे प्रतिपादन  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
 आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगावच्या २०० कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा आयुष्मान आरोग्यदूत गौरव सोहळा इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. तत्पूर्वी समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन सुशोभीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण डोंगरे, देवराज जाधव, डॉ. सुदर्शन दोशी, लक्ष्मीकांत जगताप, शशिकांत तरंगे, शिवाजी तरंगे, सचिन सपकळ, अतुल झगडे, बाळासाहेब हरणावळ, लक्ष्मण देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते. 
मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, डॉ. श्रेणिक आणि डॉ. संदेश शहा यांच्या घराण्याचा समाजसेवेचा वारसा डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा संवर्धित करत आहेत. त्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेतल्याने उत्तरोत्तर आशीर्वाद मिळत गेल्याचे मंत्री भरणे यांनी आवर्जून सांगितले. 
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, आरोग्य सचिव निपुण विनायक, राष्ट्रीय साखर महासंघा चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष किशोरभाई शहा आदींनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैय्या माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, जिल्हा प्रकल्प संचालक मृदुला होळकर, इंदापूर तालुका गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी संतोष बाबर आदी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा पुरस्काराची पार्श्वभूमी विशद करताना म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या ४ वर्षात यशस्वी राबविलेल्या विविध शासकीय योजना, ८०० हून अधिक निर्विघ्न संपन्न कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, १९ उपकेंद्रांची दफ्तर तपासणी, आधुनिक रोबोटद्वारे स्वच्छता, सुरक्षित मातृत्व अभियान, सुदृढ बालक उपक्रम, १०० हून अधिक संस्थात्मक प्रसूती, ६० हजार हून अधिक वार्षिक बाह्य रुग्ण सेवा, बाळांचे लसीकरण, गृहभेटी इत्यादी उपक्रमामुळे जिल्ह्यात तर डास निर्मूलन प्रकल्पामुळे आम्ही राज्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून सत्कारासाठी प्रियंका संदेश शहा यांनी नैसर्गिक डिंकापासून मेडल तयार करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली तर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे कौतुक केल्याने आम्हा सर्वांची जबाबदारीत वाढ झाली आहे. 
चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी चरणसिंह बडगुजर, इंदापूर शाखेचे पूर्वल मेहता, धनंजय माने, सचिन कांबळे, अजय सोनवणे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. गणराज चौगुले, देवेंद्र उत्तेकर, प्रवीण क्षीरसागर, प्रदीप गोलांडे यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते