इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा संविधान विरोधी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस ॲड. राहुल मखरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन करणारा कायदा आहे. मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा कायदा संसदेत एकमताने जरी मंजूर झाला तरी सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला मान्यता देत नाही. कारण लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य असते. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मारक असलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी असल्याने त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला तसेच महायुती सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी ही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अमोल भिसे , तालुकाध्यक्ष ऍड तेजसिंह पाटील, सागर मिसाळ
इनायत काझी यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर, शहराध्यक्ष इनायत अली काझी, सुरज धाईंजे, अजय पारसे, सुरज मखरे, बलभीम राऊत, आझाद सय्यद, अजित शेंडगे, रणजित चंदनशिवे, अल्ताफ मोमीन, नितीन देशमाने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या