मावडी सुपे ( ता. पुरंदर ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा विष्णू देवकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.मात्र त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्ञानोबा देवकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. उत्कृट भाषाशैली प्रभावी व परखड बोलणे ही त्यांची खास ओळख होती. समाजाप्रती असलेली निष्ठा व अतोनात प्रेमामुळे त्यांनी समाजाची अविरतपणे सेवा केली .त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे त्यांना सलग दोन वेळेस मावडी सुपे गावच्या सरपंच पदाचा मान देखील मिळाला होता.मागील काळात त्यांनी विकास सोसायटीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या समस्या अलगदपणे सोडवल्या होत्या .तर राजकारण विरहित केलेल्या विकास कामांसह समाज कार्यामुळे त्यांनी समाज बांधवांच्या घराघरात व तरुणांच्या हृदयात आपले स्थान पक्के केले होते.मात्र त्यांच्या निधनामुळे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हरपला अशीच भावना येथील ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.ज्ञानोबा देवकर हे मावडी सुपे गावचे माजी उपसरपंच दिलीप देवकर यांचे वडील तर पत्रकार विजय पवार यांचे ते सासरे होत.
टिप्पण्या