मानवी शरीर अनमोल असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे स्वयम शिस्तीने पालन करावे - प्रकाश खटावकर. इंदापूर, वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करून आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचेपालन करण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी केले. बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्तासुरक्षाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा होते. यावेळी उद्योजक केशव बोराटे, संजय भोंग, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब मांढरे, तालुका सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, दीपक खिलारे, कै...
SHIVSRUSTHI NEWS