इंदापुर : दि . १८जानेवारी अतीतटीच्या वाटणार्या बाभुळगाव ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनल च्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत ९-० या फरकाने जय भवानी ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवला.
वार्ड क्रमांक एक मधून अनिल दशरथ चव्हाण,शैला सोमनाथ जावळे, माजी सरपंच भारत यादव यांच्या भाऊजय छाया तानाजी यादव यांनी विजय मिळवून जय हनुमान ग्राम विकास पॅनल चे खाते उघडून दिले.दुसऱ्या फेरीत वार्ड क्रमांक दोन या माजी सरपंच संजय देवकर यांच्या हक्काच्या वार्डात घुसखोरी करत अमोल इंगळे यांच्या भाऊजय सौ संगीता राजाराम इंगळे यांनी दणदणीत विजय मिळवत सोबतीला नागनाथ गुरगुडे व दिनेश वाईकर यांच्यासह विजयश्री खेचून आणला.तिसऱ्या फेरीत वार्ड क्रमांक ३ मधून दादासाहेब भोसले,
रेश्मा गुरगुडे, शीतल खिल्लारे यांनी विजय खेचून आणत जय भवानी ग्रामविकास पॅनल चा धुव्वा उडवत विजय खेचून आणला.यावेळी बोलताना युवा नेते अमोल इंगळे म्हणाले की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साखर कारखान्याचे संचालक भास्कर गुरगूडे, कल्याण गुरगुडे, विठ्ठल मोरे,दीपक गुरगुडे,भारत यादव तसेच सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ग्रामपंचायत प्रगतीपथावर नेऊ व भविष्यात बाभुळगाव ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून पाच वर्षात उदयास आणली जाईल, बाभुळगाव मधील जनतेने आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो व त्यांच्या ऋणातून पाच वर्ष काम करूनच उतराई होऊ अशा भावना व्यक्त केल्या.
टिप्पण्या