इंदापूर: शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये सोमवारी (दि.18 ) एका दिवसामध्ये उच्चांकी 5011 मे.टन ऊसाचे गाळप केले, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी आज (मंगळवारी) दिली.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामात कारखान्याने 6.50 ते 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज अखेर कारखान्याने 4 लाख 5500 मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. सध्या दररोज सुमारे 4700 ते 4800 मे. टन क्षमतेने गाळप केले जात आहे, अशी माहिती अध्यक्ष पवार यांनी दिली.
कारखाने आजअखेर 1 कोटी 98 लाख 32737 युनिट विजेची विक्री केली आहे. तर अल्कोहोलचे 42 लाख 40725 ली. आणि इथेनॉलचे 31 लाख 86607 ली. उत्पादन घेतले आहे. ऊस पिकासाठी कारखान्याचे ' कृषीरत्न ' हे सेंद्रिय खत विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे तसेच कार्यकारी संचालक एस.जी गेंगे-पाटील यांनी केले आहे.
=====
-------------------------------------------
_____________________________
टिप्पण्या