इंदापूर !! (विलासराव गाढवे, धनंजय कळमकर)
राज्यातील साखर उद्योगा संदर्भात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुणे येथे रविवारी (दि.17) चर्चा केली व केंद्र सरकारने विविध उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणी केली. साखर उद्योगातील अडचणी संदर्भात दिल्लीत लवकरच बैठक घेतली जाईल, केंद्र सरकार साखर उद्योगाला सहकार्य करणेसंदर्भात सकारात्मक असल्याचे यावेळी रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योगासाठी इथेनॉलचे धोरण जाहीर केलेबद्दल तसेच 60 लाख मे.टन साखर निर्यातीस अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारचे व रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारने साखर विक्रीची किंमत किमान रू. 3400 करावी, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली. तसेच एनसीडीसी व एसडीएफकडील साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, यासह साखर उद्योगातील अनेक विषयांवरती याप्रसंगी चर्चा झाली. यावेळी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्ली ( इस्मा)च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु.अंकिता पाटील उपस्थित होत्या.
साखरेच्या मासिक कोट्यात अचानकवाढ नको -हर्षवर्धन पाटील
-----------------------------------------
केंद्र सरकारकडून अनेक वेळा कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या साखरेच्या मासिक कोट्यामध्ये अचानकपणे वाढ केली जाते, त्यामुळे बाजारामध्ये साखर मोठ्या प्रमाणावर येऊन दरात घसरण होते.तसेच काही वेळेला व्यापारी टेंडरही भरत नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या मासिक कोट्यात अचानकपणे वाढ करू नये,असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
________________________________
टिप्पण्या