मानवी शरीर अनमोल असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे स्वयम शिस्तीने पालन करावे - प्रकाश खटावकर.
इंदापूर,
वाहन चालवताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात काही जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करून आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचेपालन करण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी केले.
बारामती उपप्रादेशिक परिवहन विभाग, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने आयोजित ३२ व्या रस्तासुरक्षाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा होते. यावेळी उद्योजक केशव बोराटे, संजय भोंग, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब मांढरे, तालुका सचिव धनंजय कळमकर, शहराध्यक्ष सुरेश जकाते, दीपक खिलारे, कैलास पवार ,तात्या पवार, किरण राऊत, कृष्णकुंज खटावकर उपस्थित होते. यावेळी सुरक्षितता नियमावलीची प्रसिद्धी पत्रके वाटण्यात आली.
प्रकाश खटावकर पुढे म्हणाले, रस्त्यावर होणारे अपघात प्रामुख्याने वाहनास ओव्हरटेक करताना, दारू पिवून वाहन चालविल्याने तसेच रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने न दिसल्याने होतात. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन स्वयंशिस्तीने करणे गरजेचे आहे.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा म्हणाले, मानवी शरीर हे अनमोल असून कोणतेही मानवी अवयव बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे अपघात होवू नये तसेच अपंगत्व येऊ नये म्हणून सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.
यावेळी प्रकाश खटावकर व जिल्हा अध्यक्ष संदेश शहा म्हणाले की बालाजी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था बिजवडी अध्यक्ष विलासराव गाढवे व शिवसृष्टी कला क्रिडा व शैक्षणिक संस्था हिंगणगाव अध्यक्ष धनंजय कळमकर यांनी शेकडो हायस्कूल व काॅलेज वर आरटीओ नियमांचे पोस्टर्स लावून नेहमीच जनजागृती करत आहेत, व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी ही हे काम हाथी घ्यावे व अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे आसे आवाहन प्रकाश खटावकर व संदेश शहा यांनी व्यक्त केले,
यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी वाहतुकीचे नियम, कागदपत्रे तर ओरीयंट इन्शुरन्स कंपनीचे तालुकाप्रमुख
प्रकाश एकविरे यांनी अपघाती विम्याचेमहत्व
विशद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलनतैय्यब शेख तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलावर तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णुपंत बागल, दत्ता बुनगे, संजय राऊत यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या