मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर :पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  व त्यांचे काही सहकारी पोलिस कर्मचारी यांनी गेल्या वर्षात इंदापूर शहर व परिसरात धुमाकुळ घातला आहे. याचे अनेक व्हिडिओ व कागदोपत्री पुरावे वारंवार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून सुद्धा या गुन्हेगारी वृत्तीच्या पोलिसांच्यावर कारवाई होत नाही आसे मत निवेदनात राहुल मखरे यांनी व्यक्त केले आहे ,ते पुढे म्हणाले की,. दि. १९/१/२०२१ रोजी दुपारी ३ चे दरम्यान पोलिस वसीम नजीर शेख यांचे घरी त्यांची पत्नी व ७ वर्षाचा मुलगा अरहन घरात असताना घरी गेले. त्यौपकी मांडगे नावाच्या पोलिसाने एकट्याने घरात प्रवेश करुन आतुन दरवाजाची कडी लावली व तुझा नवरा कुठे आहे. व गुटख्याचा माल कुठे लपविला आहे हे सांग नाहीतर तुला उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिली. आतुन कडी लावल्याने वसीम शेख च्या पत्नीने आरडा ओरडा सुरु केल्याने ते नंतर तेथुन निघून गेले. या संदर्भातील तक्रार देण्यासाठी अनेक महिला व कार्यकर्ते साधरपणे ४.३० पासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक धनवे व जाधव यांनी या प्रकाराबाबतीत महिलांची माफी मागितली, परंतु महिला तक्रार देण्यावर ठाम असल्याने रात्री ८.३० वा. पोलिसांनी तक्रार घेतली. हे सर्व प्रकरण आता अंगलट येणार आहे हे लक्षात आल्यावर पीआय सारंगकर, पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे व चव्हाण यांनी त्याच रात्री १२.३६ ला सोहेल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

 त्या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये पोलिसांचे म्हणणे प्रमाणे सोहेल शेख व वसीम शेख पोलिसांनी हाक मारुन सुद्धा न थांबता पळून गेले असे नमुद केले आहे. हे पोलिसांचे म्हणणे धादांत खोटे आहे यासाठी आम्ही काही पुरावे देत आहोत आशी माहीती निवेदनात मा.अॅड. राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव,बहुजन मुक्‍ती पार्टी यांनी दिली, ते पुढे म्हणाले की 


     १) पोलिसांचे म्हणणे प्रमाणे रेडची वेळ दुपारी असल्याने शेख मोहल्ला परिसरात पोलिसांनी हाका मारत असताना, वसीम शेख पळून जात असताना अनेक लोकांनी पाहिले असेल. पण वास्तविक पाहता अशी घटना घडलीच नसल्याने शेख मोहला व आसपासच्या परिसरात हि घटना पाहणारा एकही व्यक्ति मिळून येणार नाही.

२) याही पेक्षा महत्त्वाचा व काऊंटर पुरावा म्हणजे वसीम शेख व मी सकाळी ११.३० पासून रात्री ८.३० पर्यंत बरोबर होतो. सकाळी ११.३०ते १२.०० च्या सुमारास बामसेफ चे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे साहेब यांचे बरोबर निमगांव केतकी येथील बहुजन मुक्ती पार्टीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे बोलेरो गाडीत निमगांव केतकी येथे गेलो . सत्काराच्या कार्यक्रमास साधारपणे १५० ते २०० लोक उपस्थित होते, व त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणुन वसीम शेख याचाही सत्कार करण्यात आला, त्यावेळीचे फोटो व व्हिडिओ शुर्टींग निमगांव केतकी येथील स्थानिक कार्यकर्त्यांच्याकडे उपलब्ध आहे. २.१५ चे सुमारास आम्ही निमगांव वरुन निघुन दुपारी २.३७ चे सुमारास मी वसीम शेख व इतर कार्यकर्त्यांसह घरी आलो. दुपारी ३ च्या सुमारास पत्रकार देवा राखुंडे व राहुल ढवळे हे माझ्या घरी आले. त्यांनी पुनम कडवळे या पुणे जिल्ह्यातून ग्रामपंचायत  निवडणूकीत निवडून आलेल्या सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्याची मुलाखत माझ्या घरीच घेतली. त्याठिकाणी पत्रकारांच्या समोर वसीम शेख उपस्थित आहे. दि १९/१/२०२१ रोजी माझी अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्याकडे अपॉयमेंट असल्याने मी, वसीम शेख व नानासाहेब घव्हाण यांना घेऊन दुपारी ४ च्या दरम्यान अकलूजला गेलो. अकलूजला निघतानाच वसीम शेख याने मला घरुन , पत्नीचा फोन आला होता. व पोलिसांनी जी असभ्य वर्तणुक केली त्याची माहिती दिली होती. व मला घरी जावे लागेल असे सांगितले परंतु पोलिस तुला खोट्या गुन्ह्यात आडकवतील, तू माझ्या बरोबर अकलूजला चल असे सांगितल्याने तो माझ्यावरोबर अकलूजला आला. अकलूज येथे मी, वसीम शेख व नानासाहेब चव्हाण सांयकाळी ६.३० च्या सुमारास इंदापूर पोलिस स्टेशमध्ये आलो. सकाळी ११.३० पासून वसीम शेख रात्री ८.३० पर्यंत माझ्याबरोबर होता. त्याबाबत निमगांव केतकी येशील कार्यकर्त्यांनी दुपारी १२,३०ते २.१५ पर्यंत काढलेले फोटो व व्हिडिओ दुपारी २.३० ते ४ च्या दरम्यान माझ्या घरचे सिसिटीव्ही फुटेज व त्यामध्ये मी, वसीम शैख, पत्रकार देवा राखुंडे व राहुल ढवळे, सुरज धाईजे, किशोर धाईंजे, नानासाहेब चव्हाण, पुनम कडवळे, संतोष ' कडवळे व अन्य लोक आहोत. त्याचे सिसिटिव्ही फुटेज आपणाकडे देत आहे. या सर्व गोष्टीवरुन हे सिद्ध होत आहे की, पीआय सारंगकर, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण व मांडगे हे विकृत मनोवृत्तीने काम करीत आहेत. या मांडगे या पोलिस कर्मचाऱ्याने जे कृत्य केले त्यावर पडदा टाकण्यासाठी फिर्यादीमध्ये बनावट मजकूर टाकण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सारंगकर, पोलिस कर्मचारी चव्हाण व मांडगे यांनी त्याच्याकडील व्हिडिओ शुटींग कोर्टात दाखल करावे किंवा सार्वजनिक करावे. असे आवाहन आम्ही करीत आहोत. दि. २३/१/२०२१ पासून इंदापूर पोलिस स्टेशन समोर पिडीत महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु होत आहे. पीआय सारंगकर व त्यांच्या पिटटू विषयी अनेक तक्रारी देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने शहर व परिसरातील नागरिकांच्यामध्ये असंतोष वाढत चालला आहे. या पीआयला वाचविण्यामध्ये राज्यमंत्री भरणे, पोलिस अधिक्षक, अभिनव देशमुख व अप्पर पोलिस अधिक्षक मोहिते यांचा हात असल्याने जर भविष्यात कायदा व सुव्यवस्था यांची काही परस्थिती निर्माण झाली तर या तीन लोकांना जबाबदार धरण्यात यावे. अशी मागणी गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांच्याकडे करीत आहोत. पीआय सारंगकर व इतर कर्मचारी यांच्या वरगुन्हे दाखल करण्यात यावेत म्हणुन दि. १९/१/२०२१ रोजी गणपत बाबर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचाही या पीआयवर कारवाईसाठी उपयोग करावा ' ही मागणी  अॅड. राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव, बहुजन  मुक्‍ती पार्टी यांनी केली आहे, 

===============================आम्ही इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली होती त्या साठी  यांच्याशी भ्रमणदूरध्वनीसंचाच्या वतीने  संपर्क साधला असता त्यांनी आमचा भ्रमणदूरध्वनी घेतला नाही, 

============================

एकिकडे महीला सबलीकरण झाले पाहिजे म्हणून शासणाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत पण महीला इंदापूर तालुक्यात तरी सुरक्षित नाहीत याचे उदाहरण म्हणजे च वरिल घडलेली घटना. यावर महीला आयोग काय पवित्रा घेणार का मुग गिळून गप्प बसून मजाच बघणार आहेत.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...