मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भावाच्या पुण्यतिथी चा31हजार रूपये खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत.   इंदापुर: कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही.नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार,  आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .      आज महाराष्ट्राच्या धरतीवरती  एवढे मोठे संकट असताना माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना व जनतेला आव्हान केले होत...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  कोरोना मुळे झाला भलताच खेळ त्या मुळे, सुतार समाजातील कारागिरांनवर आली उपासमारीची वेळ . इंदापुर:तालुक्यातील  निरा नरसिंहपुर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन केले त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली . सुतार समाज हा ग्रामीण भागात खेडेगावांमध्ये  शेतकर्‍यांना शेती विषयक अवजारे बनवुन देण्याचे काम करतो.आणि कामाच्या बदल्यात तो शेतकी माल शेतकर्‍यांना कडून घेतो किंवा काही लोग त्याच्या बदल्यात पैसे देत असतात आणि त्यावर ते आपला जीवनाचा उदरनिर्वाह करतात हातावरचे पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम व्यवसाय बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे. घरगुती व इतर फर्निचरचे काम बंद असल्याने सुतार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठवडय़ातपासून काम बंद असल्याने व आगामी काही दिवस काम बंद राहणार असल्याने या कारागीरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. त्यातच जीवनाशक्य वस्तू संपल्या असून रोज हातावरचे पोट असल्याने  पैसे आणायचे कोठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे. सुतारकाम या क्षेत्रातील कामगार हे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी - *कु. अंकिता हर्षवर्धन पाटील राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे ही विनंती सोशल मिडिया च्या  माध्यमातून केली आहे.    आधीच कोरोणाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  लोकडाऊन मुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या शेती मालाला भाव नाही. काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतमालाला नेण्यासाठी साधन उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल शेतातच पडून आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्या या अवकाळी पावसामुळे अजुन फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे व काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू, कल...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई द्यावी- तालुका भाजपची तहसीलदारांकडे मागणी                        इंदापूर :तालुक्यामध्ये शनिवारी (दि.18) रात्री झालेल्या अवकाळी अशा वादळी पावसाने व गारपिटीने फळबागांचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त फळबागांचे व शेतीपिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी(दि.20) निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.                        अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीठ झाल्याने नुकसानाची तीव्रता वाढली आहे.तालुक्यातील  डाळिंब, द्राक्ष, केळी या फळबागांचे तसेच गहू, हरभरा, मका, ऊस तसेच कडवळ, मकवान या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले  आहे. सध्या राज्यात लॉक डाऊन असल्याने शेती पिकांना भाव नाही व दुधालाही कमी भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. सध्या अशी अडचणीच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी तयार केलेले मास्क    इंदापूर: तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मास्क तयार केल्याची माहिती इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. गौतम यादव यांनी दिली.     इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 56 स्वयंसेवक कोरोना मुक्तीसाठी काम करीत आहेत. तीन स्वयंसेवकांनी 100 लिटर सॅनीटायझर तयार केले ते इंदापूर नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आले.15 स्वयंसेवकांनी ग्रामीण भागांमधील  प्रत्येकी दहा कुटुंबे दत्तक घेऊन त्यांना कोरोना विषयाची माहिती सांगितली.काही संशोधकांनी पोस्ट तयार केलेआहेत. काही विद्यार्थ्यांनी याबाबतचे व्हिडीओ तयार केलेले आहेत.      कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहणे आवश्यक आहे तसेच अत्यावश्यक सेवेसाठी जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा सोशल डिस्टन्स बरोबरच मास्कचा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

.धनंजय बाब्रस (माजी उपनगराध्यक्ष इं.न.पा.)मिञ परीवार यांच्या माध्यमातुन गरजु गोर-गरीब नागरिकांसाठी अन्नधान्यांचे किट वाटप इंदापुर : कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..सामाजिक बांधिलकी म्हणून  सामाजिक कार्यात सतत  अग्रेसर आसणारे इंदापुर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी व धाडसी माणूस  .मा.श्री.प्रदीप (दादा) गारट...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना जिल्हा नाकाबंदीतून सवलत - हर्षवर्धन पाटील यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा -रुग्णांना अकलूजला जाण्यास सवलत इंदापूर:तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना जिल्हा नाकाबंदीतून सवलत  - हर्षवर्धन पाटील यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा  इंदापूर: तालुक्यातून अकलूज बाजारपेठेमध्ये जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व भाजीपाला वाहनांना तसेच गरजू रुग्णांना ये-जा करणेसाठी जिल्हा नाकाबंदीतून परवानगी देण्यात आली आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शनिवारी (दि.18) यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, माळशिरसचे प्रांताधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील सुमारे 60 गावांमधील नागरिकांची गेली 27 दिवसांपासून होणारी मोठी गैरसोय दूर झाली आहे.                   सराटी सह अनेक ठिकाणी इंदापूर व माळशिरस या तालुक्याच्या सीमा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळणेसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इंदाप...