इंदापुर: कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही.नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे
असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
आज महाराष्ट्राच्या धरतीवरती एवढे मोठे संकट असताना माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना व जनतेला आव्हान केले होते मदतीचा हात म्हणून पुढे यावे आणि माणसातील माणूस जागा झाला आणि आमचा शिवसैनिक गलांडवाडी नं. 2 चे श्री सतीश केशव गलांडे यांनी आपल्या भावाच्या स्वर्गीय शरद केशव गलांडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचा कार्यक्रम न करता एक अतिशय महत्त्वाचे चांगला निर्णय घेतला व त्यांच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळावी आणि खरंच देव कुठे आहे तो त्यांनाच कळाला असे पाऊल उचलले की
त्यांनी 31.000 रु पुण्यतिथीला खर्च न करता तो खर्च आज गोरगरिबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्रीनिधी मध्ये त्यांनी तो आज रोजी इंदापूर शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी दिला व तो चेक घेऊन प्रांत अधिकारी कांबळे साहेब यांना तहसील कार्यालय मध्ये जाऊन सुपूर्त करण्यात आला व यावेळेस बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे , तहसीलदार सोनाली मेटकरी , शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,जि ,प सदस्य अभिजीत तांबिले, हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे चिटणीस दुर्वास शेवाळे, इंदापूर शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी ,योगेश वाघमोडे ,अमोल शिंदे ,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या