इंदापूर:तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना जिल्हा नाकाबंदीतून सवलत - हर्षवर्धन पाटील यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा इंदापूर: तालुक्यातून अकलूज बाजारपेठेमध्ये जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या व भाजीपाला वाहनांना तसेच गरजू रुग्णांना ये-जा करणेसाठी जिल्हा नाकाबंदीतून परवानगी देण्यात आली आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शनिवारी (दि.18) यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, माळशिरसचे प्रांताधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील सुमारे 60 गावांमधील नागरिकांची गेली 27 दिवसांपासून होणारी मोठी गैरसोय दूर झाली आहे.
सराटी सह अनेक ठिकाणी इंदापूर व माळशिरस या तालुक्याच्या सीमा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळणेसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंदापूर तालुक्यातून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना व गंभीर आजारी व्यक्तींना तसेच शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना व किराणा दुकानदारांच्या वाहनास नाका-बंदीतून सोडले जात नसल्याने नागरिक त्रस्त होते. नका बंदी मुळे इंदापूर तालुक्यातील किराणा दुकाने,औषध दुकानांमध्ये मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
यासंदर्भात इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अडचणी मांडल्या. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानुसार आता इंदापूर तालुक्यातील जीवनावश्यक वस्तुंच्या व भाजीपाला वाहनांना तसेच गरजू रुग्णांना नाकेबंदीतून अकलूजला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील गंभीर रुग्णांना जिल्हा नाका-बंदीतून अकलूजला रुग्णालयांमध्ये जाण्यास सवलत देण्यात आली आहे.त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
दरम्यान,यासंदर्भात आज शनिवारी बावडा येथे किराणा दुकानदार व मेडिकल चालक यांच्याशी नीरा भीमा कारखाना संचालक उदयसिंह पाटील, तलाठी बंडू आव्हाड, ग्रामविकास अधिकारी बी.ए.नागपुरे यांनी चर्चा करून जिल्हा नाका-बंदीमधून अकलूजला जीवनावश्यक वस्तूंची वाहने ये-जा करण्यास सोलापूर जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती दिली. यावेळी दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.
___________________________
टिप्पण्या