राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे ही विनंती सोशल मिडिया च्या माध्यमातून केली आहे.
आधीच कोरोणाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकडाऊन मुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या शेती मालाला भाव नाही.
काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतमालाला नेण्यासाठी साधन उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल शेतातच पडून आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
त्या या अवकाळी पावसामुळे अजुन फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
या अवकाळी पावसामुळे व काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू, कलिंगड, टरबूज , ऊस, मका ,कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे , संत्र्याचे व डाळिंब बागांचे, यासोबतच फळबागा आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही विनंती कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
टिप्पण्या