इंदापूर: तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मास्क तयार केल्याची माहिती इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. गौतम यादव यांनी दिली.
इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 56 स्वयंसेवक कोरोना मुक्तीसाठी काम करीत आहेत. तीन स्वयंसेवकांनी 100 लिटर सॅनीटायझर तयार केले ते इंदापूर नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आले.15 स्वयंसेवकांनी ग्रामीण भागांमधील प्रत्येकी दहा कुटुंबे दत्तक घेऊन त्यांना कोरोना विषयाची माहिती सांगितली.काही संशोधकांनी पोस्ट तयार केलेआहेत. काही विद्यार्थ्यांनी याबाबतचे व्हिडीओ तयार केलेले आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहणे आवश्यक आहे तसेच अत्यावश्यक सेवेसाठी जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा सोशल डिस्टन्स बरोबरच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच नागरिकांना मास्कचा वापर करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी घरच्या घरी मास्क तयार करून नागरिकासाठी उपलब्ध केले.
टिप्पण्या