मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनिताताई खरात यांनी मानले इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे आभार

 इंदापूर तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई खरात यांनी आज इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक प्रतिष्ठित नागरिक यांचे आभार मानले कारण अनिताताई म्हणाल्या की गेल्या 7 मे पासून 22 मे पर्यंत मी पंधरा दिवस इंदापूर तालुक्यात जनजागर यात्रा काढली व या जनजागर यात्रेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला निवेदन दिलं की 2023 रोजी जो शासनाच्या महिला व बालविकास विभागाने जीआर काढून ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येकी दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान गौरव पुरस्कार देण्यात यावा या पुरस्काराचे वितरण 2024 रोजी झाली नाही ते आपण 2023 प्रमाणे पूर्ववत करून आपल्या गावातील दोन महिलांना किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत पुरस्कार वितरण करावा आणि आज अनिताताई म्हणाल्या की मला इंदापूर तालुक्यातून खूप ग्रामपंचायत क्षेत्रातून महिलांचे कार्यकर्त्यांचे फोन आले फोटो आले की ताई आम्हाला आपण केलेल्या पंधरा दिवसाच्या परिश्रमामुळे जनजागर यात्रेमुळे आम्हाला आमच्या गावात पुरस्कार मिळाला, खूप स...

इंदापूरच्या आश्रमशाळेत लोककल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

*इंदापूर*(दि.३१) : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानीत वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आत्मप्रतिष्ठा जपत शेवटच्या क्षणापर्यंत न्यायाने वागून अजरामर झालेल्या शौर्यशाली, धैर्यशाली, लोक कल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व राजमाता अहिल्याबाई होळकर, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, नानासाहेब सानप,प्रा.संतोष चोरमले, सतीश कोल्हे, मनिषा जगताप - मखरे,अधिक्षक अनिल ओहोळ, अनिसा मुल्ला, लता सातपुते, निता भिंगारदिवे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पेण शहरात आरोग्य धोक्यात,दुषित पाणी घराघरात

पेण:- नगरपालिकेचे दुर्लक्ष,मानसुन पूर्व नियोजनाची तयारी कुचकामी खराब पाणी, खराब रस्ते, फेरीवाले, ट्रॅफिक समस्या, पार्किंगचे शुन्य नियोजन,शहरात सुलभ शौचालय यांचे नियोजन करता येत नसेल तर,यांच्या बदल्या करा जनतेची मागणी,पेण शहरा मध्ये मोठया प्रमाणात तयार होणाऱ्या नवीन इमारती,आरक्षण,नवीन गाळे जागोजागी उभारलेले आहेत यात अधिकृत अनधिकृत किती याची माहिती नाही,शहरात शहरीकरण वाढवता मग अगोदरच्या स्थानिक लोकांच्या नियोजनाचे काय ही सर्व जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे,जुना पेट्रोल पंप ते आर. टी. ओ,दातार अळी बोरगाव रोड, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेलेआहेत,राजकारणी एकमेकांवर टीका करतात पण सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची आहे, ही समस्या सोडवली नाही गेली तर याची तक्रार, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे नक्की जाणार ही जनचक्र न्युज ची हमी आहे आता खुर्च्या बदलणार

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा   मुंबई, दि. 28 : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविका...

संघर्षनायक ॲड. राहुल मखरे(वकीलसाहेब)एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.

हजरजबाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण ॲड. राहुलदादा मखरेंकडे असल्यामुळे तल्लख विलक्षण बुद्धीमत्तेने समोरच्या व्यक्तींच्या मनात अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नेतृत्व,वक्तृत्व, आणि कर्तृत्व या त्रिवेणी संगमाचा मिलाप म्हणजे वकीलसाहेब. कोणत्याही प्रसंगात मिश्किल, विनोदी शैली त्यांच्या वाणीत पहावयास मिळते. नेतृत्व करायला वय लागत नाही, लागत ते साहस, बुद्धी, चातुर्य आणि निर्णय क्षमता..! हे वकीलसाहेबांच्या बुद्धीचातुर्यातून सहज दिसून येते. कॉलेज जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त उदंड दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!! महाविद्यालयीन जीवनातच वकील साहेबांना सामाजिक कार्याची गोडी लागली. प्रेमाने संवाद साधणारे वकीलसाहेब कित्येकदा सामाजिक कार्य करताना सर्वांना आनंद देणारे युवा नेतृत्व भावतात. प्रभावीत करण्याची कला व क्षमता यांचा अनोखा संगम म्हणजे ॲड. राहुलदादा मखरे (वकील साहेब)! सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना व्यावसायिक  दृष्टिकोन बाजूला ठेवून सर्वांना मदतीचा हात देणारे वकीलसाहेब. अहोरात्र कष्ट करताना, जनहित डोळ्यासमोर ठेवून...

सागर कांबळे यांना ‘युथ एक्सलन्स अवॉर्ड 2025’ मिळाल्याबद्दल सन्मान

इंदापूर –नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि नवउद्योजकतेसाठी दिला जाणारा रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचा ‘युथ एक्सलन्स अवॉर्ड 2025’ सागर हनुमंत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व इतर संस्थांच्या मदतीने २०२१ ते २०२४ या काळात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही पावती आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर २७ मे २०२५ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात संस्थेच्या वतीने सागर कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे आरोग्य विभाग प्रमुख श्री. महादेव चव्हाण, ‘कोपिवरची शाळा’ विभागप्रमुख श्री. भारत बोराटे आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. हमीदभाई आतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सागर कांबळे सध्या ते ट्रस्टमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून पूर्णवेळ कार्यरत असून, संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय योगदान देत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप, जावेद हबीब विभागाचे प्रमुख श्री.अमोल राउत, फॅशन विभागाच्या प्रमुख सौ.त्रिशल...

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी - प्रविण माने

इंदापूर:- रविवार दिनांक २५ मे रोजी इंदापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधी होत नसल्याने, अवकाळी ओढवलेल्या या परिस्थितीने शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ढगफुटीसदृश पावसाने, नीरा नदीच्या पाणी पातळीतदेखील अचानक वाढ होऊन, नदीच्या काठावरील गावांतून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे एकीकडे ढगफुटीसारखा पाऊस व त्यावर नीरा नदीच्या पुराने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे,भिगवण,मदनवाडी, भिगवण स्टेशन, सणसर, जांब, कुरवली, चिखली, उद्धट, लाकडी, निंबोडी आदी गावांसह नीरा नदी काठची गावे हि विशेष बाधित झाल्याची परिस्थिती आहे. या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील कुटुंबांनचे मोठे नुकसान झाले आहे. नागरीवस्तीप्रमाणे दुसरा सर्वांत जास्त बाधित घटक म्हणजे शेती असून, कालच्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने डाळिंब, द्राक्षे, पेरू, केळी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमुग, चारा पिका...

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा-उपमुख्यमंत्री* बारामती, दि.२६: बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, एनडीआरएफच्या निकषानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले. श्री. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील इमारती, कन्हेरी वनोद्यान, कन्हेरी काटेवस्ती येथील नीरा डावा कालवा, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर तालुक्यातील सणसर, निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण येथील बसस्थानक परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. श्री.पवार म्हणाले, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १४ इंच असून काल २५ मे रोजी एकाच दिवशी ७ इंच पाऊस झाला आहे. नीरा डावा कालवा लिमटेक आणि काटेवाडी आणि भवानीनगर दरम्यान...

अवकाळी पावसाने व पुराने नुकसानग्रस्त पिकांचे व मालमत्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी- हर्षवर्धन पाटील

जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी चर्चा इंदापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाचे थैमान इंदापूर :                             इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी (दि.25) झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने शेती पिकांचे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच नीरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे, फळबागांचे व मालमत्तांचे तात्काळ पंचनामे सुरु करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली. या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी रविवारी संपर्क साधून चर्चा केली.        हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील भिगवण, सणसर परिसरातील सुमारे 12 ते 15 गावांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये जांब, कुरवली, चिखली, सणसर, उद्धट, लाकडी, निंबोडी, शेटफळ गढे, मदनवाडी, भिगवण, भिगवन स्टेशन आदी गावा...

अॅड. रणजित राजदत्त उबाळे यांचीबारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक

बारामतीः -बारामती तालुका विद्यीज्ञ समितीवरील मिळालेल्या जबाबदारीमुळे जनता न्यायालयाव्दारे (लोकअदालती) खटले निकाली काढून पिडीत व्यक्तींना जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवूण देणे, लोकांमध्ये कायदेशीर जागृकता निर्माण करणे, पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत व सल्ला देणे, असे या जबाबदारीचा समाजहितासाठी उपयोग करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या समितीची निवड जिल्हा विधीसेवा प्राधीकरण सचिव यांनी त्यांची निवड केलेली असून या समितीवरती एकूण २१ वकीलांची निवड झाली असून त्यातील गरजू व पिडीतांसाठी झटणारे अॅड रणजित राजदत्त उबाळे हे एक तरूण वकील आहेत. गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे दिवंगत पंचायत समिती सदस्य व लोकनेते राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांचे ते सुपूत्र असून त्यांना गोरगरीबांची सेवा करण्याचे बाळकडू उबाळे परिवाराकडूनच मिळाले आहे. हे व्रत मी पुढे असेच चालु ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी संस्थेतील खेळाडूंचे राष्ट्रीय पातळीवरील ऍथलेटिक्स व कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश

इंदापूर :- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील खेळाडूंची राष्ट्रीय  पातळीवर धमाकेदार कामगिरी*  युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने  राष्ट्रीयपातळी वरील ॲथलेटिक्स /कबड्डी स्पर्धा,  *त्यागराज स्टेडियम न्यू दिल्ली*    या ठिकाणी संपन्न झाल्या व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सर्व राज्यातील जवळपास 4000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये, *महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी च्या विद्यार्थ्यांना,घवघवीत यश मिळवले*  08वर्ष वयोगट मुली 50M/100M 1) *कु.स्वरा डोंगरे सिल्व्हर मेडल 10 वर्ष वयोगट मुली  50M रनींग 2) *कु.आराध्या खेडकर ब्रॉंझ मेडल*        भाला फेक 19 वर्ष मुले 3) कु.क्षितज जगताप ब्रॉंझ मेडल 800 M 19 वर्ष मुले 4) *कु.अंकित मोहिते सिल्व्हर मेडल*          17 वर्ष  कबड्डी  ब्रॉंझ मेडल 5) *कु.प्रती...

सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे आंदोलन थांबणार नाही-हमीदभाई आत्तार

इंदापूर:- 2017 पासून महाराष्ट्रातील नगरपालिकेने नागरिकांच्या मालमत्तेवरील व खुल्या जागेवरील घरपट्टीला वार्षिक 24 टक्के व्याज लावलेले होते त्याविरुद्ध वरील दिनांक पासून इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती इंदापूरकरांचे प्रतिनिधित्व करीत वेगवेगळ्या मार्गाने व्याजमाफीसाठी आंदोलन करीत होते परंतु सदर आंदोलनाकडे महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे दिनांक 27 मार्च 2023 पासून संघर्ष समितीने नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेतली . मुख्यमंत्र्यांनी व्याज व शास्ती माफी साठी अभय योजना लागू करण्याची भूमिका घेतली परंतु सदर अभय योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मध्ये तरतूद नसल्याचे आढळून आले त्यामुळे मंत्रिमंडळाने नगरपालिका 1965 च्या कायद्यात दुरुस्ती करून शासकीय  व व्याजामध्ये माफी देता येऊ शकते अशा प्रकारचा कायदा राज्यपालांच्या सहीने वटहुकूम करून 30 एप्रिल 2025 रोजी अध्यादेश काढला . सदर अध्यादेशाच्या आधारे दिनांक 19 मे 2025 रोजी नगरपालिका नगरपरिषद ,नगरपंचायत क्षेत्रामध्ये थकीत मालमत्ता करा व...

*डॉ. शितल मनोजकुमार माने पवार आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा वाचस्पती पुरस्काराने सन्मानित*

इंदापूर :-गोवा हिंदी अकादमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलन थायलंडच्या बँकॉक शहरात संपन्न झाले.कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विषयाच्या विभागप्रमुख डॉ. शितल मनोजकुमार माने पवार यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा वाचस्पती पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.           डॉ. शितल माने पवार यांना जागतिक दर्जाच्या हिंदी भाषा विकास, संवर्धन, संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल थायलंड मधील भारताच्या दूतावासातील हिंदी विभाग प्रमुख व ग्लोबल इंडिया इंटरनॅशनलच्या प्रमुख शिखा रस्तोगी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.    यावेळी अजय रस्तोगी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष उस्मान मुलानी, संमेलनाध्यक्ष कैलास जाधव, प्रमुख अतिथी ॲड. प्रभाकर औटी, ॲड. विजय गोरडे, राजेंद्र सातपुते, शांताराम पवार हे मान्यवर उपस्थित होते.            राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष ,माजी मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष...

डाॅ.जयंत नारळीकर यांचे निधन,भावपूर्ण श्रद्धांजली ज्ञान- विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला- सौ.चित्रलाखा श्रीमंत ढोले.

इंदापूर , दि. 20 :- “जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात सौ.चित्रलाखा श्रीमंत ढोले.  यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, "डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. 'क्वासी स्टेडी स्टेट थिअरी...

डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला- महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

इंदापूर दि. 20 :- “जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, "डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ...

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ९६५) जी मौजे सराटी येथील टोल वसुली तात्काळ थांबवा - नितीन दादा शिंदे

इंदापूर;- , सुरवड, शेटफळ हवेली, भोडणी, शहाजीनगर, वकीलवस्ती, लाखेवाडी, भांडगाव, पिंपरी, भगतवाडी, कचरवाडी, गिरवी या गाांचा आर्थिक व दैनंदिन सर्व व्यवहार अकलूज या शहरा मध्ये होत असतात तसेच वैद्यकीय साठी रोज ये जा करावी लागते त्यामुळे या गावांना टोल पासून सवलत मिळावी. याबाबत दिनांक २६/०५/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता मौजे सराटी ता. इंदापूर जिल्हा पुणे. येथील टोलनाक्यावर स्थानिक नागरीक यांच्या यतीने जन आंदोलन करण्यात येत असल्याची माहीती मा.नितीन दादा शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी दिली.  , सदर बाब गंभीर व सामान्य जनतेवर अन्यायकारक असल्याने आपण संबंधित बेकायदेशीर व अवैद्य टोल वसूल करणारी खाजगी एजन्सी यांचेवर कायदेशीर कारवाई करून टोल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी आशा आसयाचे निवेदन नितीन दादा शिंदे यांनी दिले.याच्या प्रती १. मा. ना. नितीन गडकरी सो, रस्ते विकास व अवजड वाहतुक केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली,२. मा. ना. देवेंद्र फडणवीस सो, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई ३२.,३. मा. ना. शिवेदसिंहराजे भोसले सो, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्रालय मुंबई ३...