इंदापूर –नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि नवउद्योजकतेसाठी दिला जाणारा रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचा ‘युथ एक्सलन्स अवॉर्ड 2025’ सागर हनुमंत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व इतर संस्थांच्या मदतीने २०२१ ते २०२४ या काळात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही पावती आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर २७ मे २०२५ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात संस्थेच्या वतीने सागर कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे आरोग्य विभाग प्रमुख श्री. महादेव चव्हाण, ‘कोपिवरची शाळा’ विभागप्रमुख श्री. भारत बोराटे आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. हमीदभाई आतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सागर कांबळे सध्या ते ट्रस्टमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून पूर्णवेळ कार्यरत असून, संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय योगदान देत आहेत.
या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप, जावेद हबीब विभागाचे प्रमुख श्री.अमोल राउत, फॅशन विभागाच्या प्रमुख सौ.त्रिशला पाटील, केदार गोसावी, भारत माने उपस्थित होते.
टिप्पण्या