*इंदापूर*(दि.३१) : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानीत वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आत्मप्रतिष्ठा जपत शेवटच्या क्षणापर्यंत न्यायाने वागून अजरामर झालेल्या शौर्यशाली, धैर्यशाली, लोक कल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व राजमाता अहिल्याबाई होळकर, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, नानासाहेब सानप,प्रा.संतोष चोरमले, सतीश कोल्हे, मनिषा जगताप - मखरे,अधिक्षक अनिल ओहोळ, अनिसा मुल्ला, लता सातपुते, निता भिंगारदिवे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या