संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ९६५) जी मौजे सराटी येथील टोल वसुली तात्काळ थांबवा - नितीन दादा शिंदे
इंदापूर;-
, सुरवड, शेटफळ हवेली, भोडणी, शहाजीनगर, वकीलवस्ती, लाखेवाडी, भांडगाव, पिंपरी, भगतवाडी, कचरवाडी, गिरवी या गाांचा आर्थिक व दैनंदिन सर्व व्यवहार अकलूज या शहरा मध्ये होत असतात तसेच वैद्यकीय साठी रोज ये जा करावी लागते त्यामुळे या गावांना टोल पासून सवलत मिळावी. याबाबत दिनांक २६/०५/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता मौजे सराटी ता. इंदापूर जिल्हा पुणे. येथील टोलनाक्यावर स्थानिक नागरीक यांच्या यतीने जन आंदोलन करण्यात येत असल्याची माहीती मा.नितीन दादा शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी दिली.
, सदर बाब गंभीर व सामान्य जनतेवर अन्यायकारक असल्याने आपण संबंधित बेकायदेशीर व अवैद्य टोल वसूल करणारी खाजगी एजन्सी यांचेवर कायदेशीर कारवाई करून टोल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी आशा आसयाचे निवेदन नितीन दादा शिंदे यांनी दिले.याच्या प्रती १. मा. ना. नितीन गडकरी सो, रस्ते विकास व अवजड वाहतुक केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली,२. मा. ना. देवेंद्र फडणवीस सो, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई ३२.,३. मा. ना. शिवेदसिंहराजे भोसले सो, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्रालय मुंबई ३२,४. मा. प्रादेशिक व्यवस्थापक, NHAI मुंबई,५. मा. जिल्हाधिकारी सो, पुणे,६. मा. पोलीस अधीक्षक पुणे.,७. मा. उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग,,८. मा. तहसीलदार इंदापूर.
९. मा. पोलीस निरीक्षक इंदापूर.यांना दिल्या आहेत सदर आंदोलनात, सुरवड, शेटफळ हवेली, भोडणी, शहाजीनगर, वकीलवस्ती, लाखेवाडी, भांडगाव, पिंपरी, भगतवाडी, कचरवाडी, गिरवी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
टिप्पण्या