इंदापूर:- 2017 पासून महाराष्ट्रातील नगरपालिकेने नागरिकांच्या मालमत्तेवरील व खुल्या जागेवरील घरपट्टीला वार्षिक 24 टक्के व्याज लावलेले होते त्याविरुद्ध वरील दिनांक पासून इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती इंदापूरकरांचे प्रतिनिधित्व करीत वेगवेगळ्या मार्गाने व्याजमाफीसाठी आंदोलन करीत होते परंतु सदर आंदोलनाकडे महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे दिनांक 27 मार्च 2023 पासून संघर्ष समितीने नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे,म्हणून महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेतली . मुख्यमंत्र्यांनी व्याज व शास्ती माफी साठी अभय योजना लागू करण्याची भूमिका घेतली परंतु सदर अभय योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मध्ये तरतूद नसल्याचे आढळून आले त्यामुळे मंत्रिमंडळाने नगरपालिका 1965 च्या कायद्यात दुरुस्ती करून शासकीय व व्याजामध्ये माफी देता येऊ शकते अशा प्रकारचा कायदा राज्यपालांच्या सहीने वटहुकूम करून 30 एप्रिल 2025 रोजी अध्यादेश काढला . सदर अध्यादेशाच्या आधारे दिनांक 19 मे 2025 रोजी नगरपालिका नगरपरिषद ,नगरपंचायत क्षेत्रामध्ये थकीत मालमत्ता करा वरील शास्ती माफ करून कर वसुली करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबवण्याची भूमिका घेतली . शासनाच्या परवानगीने १००% टक्के व्याज माफ करता येईल यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत .संघर्ष समितीने गेल्या आठ वर्षां पासून केलेल्या आंदोलनाचे हे अंतिम यश आहे शासनाने संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात व्याज माफीचा निर्णय घेतला,इंदापूर नगरपालिकेला आवाहन करीत आहे की 100% व्याजमाफी साठी तातडीने व्याज व शास्ती माफीचा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा,नागरिकांनी नगरपालिकेकडे थकबाकीची व्याजाची रक्कम भरलेली आहे सदर व्याजाच्या रकमेचा परतावा नागरिकांना मिळावा किंवा रकमेचे भविष्यकालीन घरपट्टीमध्ये समायोजन करावे यासंबंधी शासनाने तातडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही आव्हान करीत आहे .इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती व्याजाच्या प्रश्नाबरोबरच इतर सत्तावीस प्रश्नावरही आंदोलन करीत आहे,प्रश्न मान्य झाल्याशिवाय इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे आंदोलन थांबणार नाही . यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख,प्रा . कृष्णा ताटे .,मार्गदर्शक हमीदभाई आत्तार .,लेखक महादेव चव्हाण सर,संदिपान कडवळे, धरमचंद लोढा,अविनाश कोतमिरे , सागर गानबोटे . हाजी सलीमभाई बागवान दादा पिसे, संतोष जामदार,अशोक ननवरे, भारत बोराटे बाळासाहेब क्षिरसागर , रघुनाथ खरवडे, अर्जुन शिंदे , चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, मल्हारी घाडगे , रुपेश सोनी . यांनी सांगितले .आशी माहीती हमीदभाई आत्तार यांनी दिली.
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या