*मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार 2024 एन आय एस कुस्ती कोच पै. तानाजी रामभाऊ शिंदे यांना प्रदान*
इंदापूर:-हॉकी लेजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कार समिती, ऑलम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती, कालीरामन फाउंडेशन इंडिया, मान अभिमान विकास फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार 2024 एन आय एस कुस्ती कोच पै. तानाजी रामभाऊ शिंदे लासुर्णे ता.इंदापूर यांना दिला हा पुरस्कार वितरण समारंभ 29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे पै.तानाजी यांच्या गावात, आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.