इंदापूर :
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ) पाटील हे बावडा येथे रत्नाई निवासस्थानी शुक्रवारी (दि.30) सकाळी 9 वा. पासून जनता व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व भागातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून थेट संवाद साधला आहे. इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांची सुसंवाद कार्यक्रमाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. बावडा, कुरवली, भिगवण, पळसदेव, निमगाव-केतकी येथे यापूर्वी झालेल्या सुसंवाद उपक्रमांस जनतेचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. हर्षवर्धन भाऊ पाटील हे बावडा येथे पुन्हा शुक्रवारी होणाऱ्या सुसंवाद उपक्रमामध्ये जनतेला व कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
टिप्पण्या