पुणे, दि. २३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार दत्तात्रय भरणे, संजय शिंदे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे, कार्यकारी अभियंता अमोल पवार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी रमेश ढगे, प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.
श्री. पवार यांच्या हस्ते नगरोत्थान महाअभियानांतर्गत इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीत बस डेपो ते राज्य महामार्ग क्र.७१, बारामती रस्ता ते क्रीडा संकुल, बारामती रस्ता ते तरंगवाडी, संतोष बामणे यांचे घर ते क्रीडा संकुलापर्यंतचा रस्ता ते बायपासपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी गटर करणे, खुळे चौक ते मंगेश पाटील पेट्रोल पंप (कॅनल रस्ता) ४ पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी गटर, पद रस्त्याचे कामाचे तसेच मल नि:सारण प्रणाली अंतर्गत गावठाण भागातील २२.७८ कि.मी. आणि हद्दवाढ भागातील २९.२४ कि.मी. भूमिगत गटर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन करणे व हजरत चांदशहावलीबाबा दर्गा सुशोभीकरण कामाचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले.
*शिरसोडी ते कुगांव पुलाचे भूमिपूजन*
इंदापूर शहर ते शिरसोडी रस्ता येथील शिरसोडी ते कुगांव, ता. करमाळा यांना जोडणाऱ्या १ हजार ३८० लांबीच्या उच्चस्तरीय लांब पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. उजनी धरण क्षेत्रात या पुलाचे बांधकाम होणार असून या कामासाठी ३९५ कोटी ९७ लाख ३२ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुलाचा शिरसोडी ते कुगांव येथील नागरिकांना लाभ होणार असून त्यांचा वेळ व इंधनात बचत होणार आहे.
टिप्पण्या