*इंदापूर*(*दि.२७*):- एकीकडे शहरामध्ये लाख मोलाच्या दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरु असतानाच, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात गोपालकालाच्या निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलातील गोविंदांनी दहीहंडी उत्साहात साजरी केली. डीजेच्या तालावर गोविंदा आला रे आला...., ठाकू माकूम...ठाकू माकूम आदी गाण्यांवर विद्यार्थ्यांसह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील नृत्य करत मनमुराद आनंद लुटला.
७ वी ते १२ वीच्या विद्यार्थीनींनी तीन थर लावून सलामी दिली.दुसऱ्याच प्रयत्नात मुलींच्या पथकाने पहिली दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. दहीहंडी फुटताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
मुलांचे देखील दोन पथकं दोन दहीहंड्या फोडण्यास सज्ज झाले होते.
विद्यार्थांच्या पथकांनी देखील तीन थर रचून सलामी दिली. विद्यार्थ्यांनी सुरेख मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडल्या.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे म्हणाले की,दहीहंडी एकतेचे प्रतिक आहे. देशात विविधतेने नटलेल्या भारताचे दर्शन अशा सणांमधून घडत असते.तर सर्व समाजबांधव एकत्र येत असतात.
यावेळी प्राचार्या अनिता साळवे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा लाभावा व ऐक्य निर्माण व्हावे हा यामागील एकमेव हेतू आहे.
सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला.
सदर कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा मा.शकुंतला मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार आदी आवर्जून उपस्थित राहिले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या