मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

काँग्रेस चे तानाजी भोंग यांनी केली परराज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना इंदापुरात मदत    इंदापूर:कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर तालुका कमलनगर येथील महेश जलसिंगे व जगदीश जलसिंगे या दोन पॉझिटिव रुग्णांना किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तानाजी भोंग यांनी इंदापूर येथे ॲम्बुलन्स बोलवुन त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोहचवले . याबाबत तानाजी भोंग यांनी सांगितले की मला पुणे व लातुर यजथील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे फोन आले कि इंदापूरजवळ जलसिंगे बंधुपैकी फोरव्हिलर चालकास दम लागल्याने गाडी चालवता येत नाही  आणि बोलताही येत नाही, त्यांना काही मदत करता येईल का ? यावर क्षणातच मी बघतो एवढे सांगून त्यांनी रुग्णांपर्यंत भेट घेतली . यावेळीच तानाजी भोंग यांनी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्याने त्यांनी रुग्णांसाठी ॲम्बुलन्स पाठवून दिली त्यावेळी भोंग यांनी रुग्णांना ॲम्बुलन्स मध्ये बसवुन शासकीय रुग्णालयात पाठवले , तसेच संजय भैय्या सोनवणे यांनी व तानाजी भोंग यांनी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंदनशिवे यांना सदर पेशंटची फोनवरून...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांचे कार्य प्रेरणादायी - गोकुळदास(भाई) शहा      वै.ह.भ.प.श्री. नारायणदास रामदास शहा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य गायन स्पर्धेचा निकाल जाहीर इंदापूर    इंदापूर येथील स्वातंत्र्यसेनानी वै. ह.भ.प. नारायणदास रामदास शहा यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित तसेच श्री. नारायणदास रामदास संगीत विद्यालय इंदापूर यांच्या संयोजनाने भव्य गायन स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यातआला. लॉकडाऊन आणि कोरोना पार्श्वभूमीवर आज सकाळी नारायणदास रामदास शहा यांच्या प्रतिमेचे पूजन कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास(भाई) शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा यांनी केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना गोकुळदास शहा यांनी वरील मत व्यक्त केले.         इंदापुरातील नागरिक, विविध संस्थांनी लॉकडॉउनच्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल माध्यमा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील जनता कोरोनाच्या चक्रव्यूहात, लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या प्रचारात . - जनतेत चर्चा आमदार दाखवा, पन्नास रुपये बक्षीस मिळवा. इंदापूर :  तालुक्यात एकीकडे कोरोनाने आणि हाहाकार माजवला आहे. बेडची, रुग्णवाहिका यांची संख्या अपुरी पडत आहे. उभारलेले कोविडसेंटर गच्च भरलेले आहेत. रुग्णांकरीता आवश्यक असणाऱ्या रेमडेसेवरचा इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याचा फायदा घेत काळा बाजार करणारी टोळी तयार झाली आहे. ते इंजेक्शन चक्क १२ हजार रुपयाला विकत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. जनता हतबल झाली आहे. असे असताना मात्र दुसरीकडे इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काही दिवसांपासून तालुक्यातून गायब झाले असल्याचे दृश्य आहे.  इंदापूर तालुक्यातील शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शन संदर्भात फोन केला असता समोररील मेडिकल औषध दुकानादाराने १२ हजार रुपये द्या इंजेक्शन देतो. त्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. त्याच वेळी त्या फोनवर बातचीत करताना गणेश घाडगे रुग्णवाहिका चालक निमगाव केतकी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यात चाललंय काय..? कोरोना परिस्थिती हाताळण्यास तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अपयशी-भाजपा     इंदापूर प्रतिनिधी:- इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समिती आदींच्या वतीने करण्यात आली होती परंतु अद्याप देखील या ठिकाणी ऑक्सीजन बेड उपलब्ध झाले नसून तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णासाठी बेड उपलब्ध नाही,  कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण उपचारासाठी झाडाखाली ताटकळत (छाया दिपक खिलारे व श्रेयस नलवडे )  हा घ्या पुरावा ..... औषध इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध नाही, कोरोना रुग्णाला खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारी यंत्रणा हतबल असल्याने रुग्णावर आर्थिक भार पडत असल्याने तालुक्याची कोरोना  संदर्भातली परिस्थिती हाताबाहेर गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब को...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे वतीने तहसीलदारांना निवेदन    इंदापूर: कर्मचारी वर्गाला कोवीड लस सक्तीची केली आहे. जर लस घेतली नाही तर वेतन कपात आणि इतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकार यांना माहिती आहे की, लस घेतल्यानंतर अनेक कर्मचारी व नागरीक मृत्यू पावले आहेत. तशा बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.    लस घेतल्यानंतर जर सदर कर्मचाऱ्यांचे बाबतीत विपरीत परिणाम घडले तर सरकार ने त्याची जबाबदारी घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करावी त्याबाबतचे हमीपत्र "राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे" वतीने निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी मा. संजय (डोनाल्ड) शिंदे, मा. नानासाहेब चव्हाण, मा. सुरज धाईंजे, मा. नागेश भोसले, मा. रोहित ढावरे, मा. किरण पाटील, मा. तानाजी आहेर हे उपस्थित होते.  --------------------------------------------------------------- राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे वतीने करण्यात आलेल्या मागण्या ख...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

संजय भैय्या सोनवणे तुमच्या कामात कोणीही हस्तक्षेप करणार नाही,तुम्ही राजीनामा देऊ नका-कवाडे  इंदापूर:पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज विषेश बैठक आयोजित केली होती, या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाडे उपस्थित होते,यावेळी  संजय भैय्या सोनवणे यांनी,राजीनामा देऊ नये म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे पण उपस्थित होते,  या बैठकीत संजय भैय्या सोनवणे यांना पक्षात काहीजन काम करताना अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे सोनवणे यांच्या पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले कवाडे यांनी पुर्ण विषय समजून घेऊन सोनवणे यांना असे सांगितले की तुम्ही पक्षाचे महत्वाचे नेते आहात तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आणि आम्ही तो स्विकारणार नाही, इथुन पुढे तुमच्या कामात कोणीही हस्तक्षेप  करणार नाही. तुमचे काम अतिशय चांगले चालले आहे, इथुन पुढे पण पक्षाचे काम आपण जोमाने सुरू ठेवावे, असे सोनवणे यांना सांगितले या वेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे संजय सोनवणे यांनी राजीनाम...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर नगर परिषदेचा प्रभागातील नागरिकांना कोरोणा रक्षण लसीकरण करावे- नगराध्यक्षा सौ.अंकिता  शहा  इंदापूर: मंगळवार दिनांक 6.4.2021 रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये इंदापूर नगर परिषदेच्या वतीने प्रभागातील नागरिकांना कोरोणा रक्षण लसीकरण करून घेणे बाबत व सदर आजार होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती होणेबाबत इंदापूर नगर परिषदेच्या  नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा आरोग्य विभाग सभापती श्री.अनिकेत वाघ, वीज व वृक्ष संवर्धन सभापती,सौ.सुवर्णा मखरे, नगरसेवक प्रशांत सिताप यांनी घरोघरी जाऊन प्रभागातील नागरिकांची विचारपूस करत त्यांना आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे व सुरक्षा घेणे विषयी मार्गदर्शन केले  तसेच ज्या घरांमध्ये वय वर्ष 45 च्या पुढील व्यक्ती आहेत त्यांनी कोरोना  व्यक्तींनी लस घेतली आहे का? घेतली नसल्यास लवकरात लवकर आपले नाव उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे नोंदणी करून लसीकरण करून घेण्यास विनंती केली लसीकरण करण्यास घाबरू नका उलट लसीकरण केल्यास कोरोनाव्हायरस पासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होऊन आपल्या जीवितास धोका निर्माण होणार नाही. ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले अकलूज येथील युन्नूस निजाम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन  इंदापूर - पाटबंधारे विभागात मेकॅनिकल पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले अकलूज येथील युन्नूस निजाम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रोशन इलेट्रिकलचे मालक फिरोज शेख व मेहरुन मेडिकलचे मालक सरफराज शेख यांचे वडिल तर पत्रकार हुसेन मुलाणी यांचे भावजी होते. अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. .,...................................................................