इंदापूर:कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर तालुका कमलनगर येथील महेश जलसिंगे व जगदीश जलसिंगे या दोन पॉझिटिव रुग्णांना किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तानाजी भोंग यांनी इंदापूर येथे ॲम्बुलन्स बोलवुन त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात पोहचवले .
याबाबत तानाजी भोंग यांनी सांगितले की मला पुणे व लातुर यजथील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे फोन आले कि इंदापूरजवळ जलसिंगे बंधुपैकी फोरव्हिलर चालकास दम लागल्याने गाडी चालवता येत नाही आणि बोलताही येत नाही, त्यांना काही मदत करता येईल का ? यावर क्षणातच मी बघतो एवढे सांगून त्यांनी रुग्णांपर्यंत भेट घेतली . यावेळीच तानाजी भोंग यांनी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्याने त्यांनी रुग्णांसाठी ॲम्बुलन्स पाठवून दिली त्यावेळी भोंग यांनी रुग्णांना ॲम्बुलन्स मध्ये बसवुन शासकीय रुग्णालयात पाठवले , तसेच संजय भैय्या सोनवणे यांनी व तानाजी भोंग यांनी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंदनशिवे यांना सदर पेशंटची फोनवरून कल्पना दिली ऍडमिट करुन घेण्याची विनंती केली.
याकामी तालुका सरचिटणीस राहुल आचरे यांनी रुग्णांना मदत केली .
टिप्पण्या