इंदापूर: कर्मचारी वर्गाला कोवीड लस सक्तीची केली आहे. जर लस घेतली नाही तर वेतन कपात आणि इतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य सरकार यांना माहिती आहे की, लस घेतल्यानंतर अनेक कर्मचारी व नागरीक मृत्यू पावले आहेत. तशा बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लस घेतल्यानंतर जर सदर कर्मचाऱ्यांचे बाबतीत विपरीत परिणाम घडले तर सरकार ने त्याची जबाबदारी घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करावी त्याबाबतचे हमीपत्र "राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे" वतीने निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी मा. संजय (डोनाल्ड) शिंदे, मा. नानासाहेब चव्हाण, मा. सुरज धाईंजे, मा. नागेश भोसले, मा. रोहित ढावरे, मा. किरण पाटील, मा. तानाजी आहेर हे उपस्थित होते.
---------------------------------------------------------------
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे वतीने करण्यात आलेल्या मागण्या खालील प्रमाणे...
1)1)जे कर्मचारी कामगार दीर्घ आजाराने ग्रस्त आहे त्यांनी कोवीड लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर काहीही वाईट परिणाम होणार नाही याबाबतचे लिखीत हमीपत्र देण्यात यावे.
2) ही लस घेतल्यामुळे 100% कोरोना आजार होत नाही याबाबतचे आपणाकडून लिखीत देण्यात यावे.
3)जर लस घेतल्यानंतर ही कर्मचारी दगावला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीस सदर कर्मचारी ज्या विभागात, ज्या पदावर, ज्या वेतनावर काम करत होता. त्यावर त्याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत चे लिखीत स्वरुपात हमीपत्र प्रशासनाकडून देण्यात यावे.
4)जर कर्मचारी दगावला तर त्याच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी 1 कोटी ते 5 कोटी रूपये पर्यंत ची मदत सरकारने करावी. याबाबत चे लिखीत हमीपत्र देण्यात यावे.
5) ही लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही. असे जे वैज्ञानिकाकडून संशोधन झाले आहे. त्या संशोधनाचा अहवाल सामान्य नागरिक, कर्मचारी /कामगार यांना देण्यात यावे.आसे निवेदनात म्हटले आहे,
टिप्पण्या