इंदापूर - पाटबंधारे विभागात मेकॅनिकल पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले अकलूज येथील युन्नूस निजाम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रोशन इलेट्रिकलचे मालक फिरोज शेख व मेहरुन मेडिकलचे मालक सरफराज शेख यांचे वडिल तर पत्रकार हुसेन मुलाणी यांचे भावजी होते. अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.,...................................................................
टिप्पण्या