इंदापूर तालुक्यातील जनता कोरोनाच्या चक्रव्यूहात, लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या प्रचारात.
- जनतेत चर्चा आमदार दाखवा, पन्नास रुपये बक्षीस मिळवा.
इंदापूर :
तालुक्यात एकीकडे कोरोनाने आणि हाहाकार माजवला आहे. बेडची, रुग्णवाहिका यांची संख्या अपुरी पडत आहे. उभारलेले कोविडसेंटर गच्च भरलेले आहेत. रुग्णांकरीता आवश्यक असणाऱ्या रेमडेसेवरचा इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याचा फायदा घेत काळा बाजार करणारी टोळी तयार झाली आहे. ते इंजेक्शन चक्क १२ हजार रुपयाला विकत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. जनता हतबल झाली आहे. असे असताना मात्र दुसरीकडे इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काही दिवसांपासून तालुक्यातून गायब झाले असल्याचे दृश्य आहे.
इंदापूर तालुक्यातील शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शन संदर्भात फोन केला असता समोररील मेडिकल औषध दुकानादाराने १२ हजार रुपये द्या इंजेक्शन देतो. त्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. त्याच वेळी त्या फोनवर बातचीत करताना गणेश घाडगे रुग्णवाहिका चालक निमगाव केतकी यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पीए यांनी घाडगे यांना मेसेज काय केला ? त्याचाही पुरावा उपलब्ध आहे.
या रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये कोण कोण बडे धेंडे आहेत हे लवकरच कळेल.
इंदापूरचे विद्यमान आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्याच्या मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), इंदापूर मृदू व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय तसेच सामान्य प्रशासन या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी स्विकारलेले आ.भरणे यांची प्रशासनावर कोणत्याही प्रकारची मजबूत पकड नसल्यामुळे तालुक्यात सर्रास सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. कुठल्याच विभागातील अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना बेडची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, सिरीयस रुग्णांना तालुक्याबाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. रुग्णवाहिकेची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचाराकरिता दाखल करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर मंडळी हतबल झाली आहे. मंत्र्याचा प्रशासन यंत्रणेवर मजबूत पकड नसल्यामुळे बेफिकिरीने वागण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. इथे कुंपनच शेत खात असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात अशी परिस्थिती आहे. कोरोनाने हाहाकार माजला आहे. कुणाला बेड मिळत नाहीत तर कोणाला उपचारासाठी तासनतास झाडाखाली बसून वाट पहावी लागत आहे. अशी गंभीर परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असताना या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मात्र शेजारील जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी कित्येक दिवसांपासून त्याठिकाणी तळ ठोकून असल्याचे दृश्य आहे. त्यांना त्यांच्या घरच्या जनतेच्या जीवापेक्षा त्यांना निवडणुक महत्वाची वाटत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. आता तर चक्क येथील जनता त्यांच्या तालुक्यातील उपस्थितीवर पैजा, बक्षिसे लावत आहेत. तालुक्यात आमदार दाखवा आणि पन्नास रुपये बक्षीस मिळवा...!
एकीकडे कोरोनाचे संकट आवासून उभे आहे तर दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे शेतकरी, व्यापारी वर्ग चिंतेत आहे. अशातच रुग्णांना रेमेडीसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकून गलेगठ्ठ होत आहेत. रुग्णाच्या जीवाच्या आकांताने नातेवाईकही नाईलाजाने चढ्या भावाने इंजेक्शन खरेदी करुन आपल्या घरातील सदस्याचा जीव वाचवण्याची धडपड करत आहेत. या संवेदनशील विषयाचा फायदा ही मंडळी घेत या इंजेक्शनचा काळा बाजार खुलेआम करुन माया गोळा करत आहेत. याकडे मात्र तालुक्याचे लोकप्रतिनींधीे डोळेझाक करत आहेत.
आपल्या तालुक्यातील जनतेला या कोरोनाच्या संकटातून वाचवणे, त्यांना आरोग्याच्या उत्तम सोई उपलब्ध करुन देणे, या काळात चालणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालणे येथील लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्यच ते विसरले असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे रेमेडीसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, तसेच चुकीचे काम करणाऱ्यांवर, जीवानीशी खेळणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याविषयावर ठोस पावले उचलून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा नाही तर इंदापूर तालुक्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, अशी चर्चा सामान्य जनतेतून पुढे येत आहे.
यामुळे तालुक्यात आमदार दाखवा आणि पन्नास रुपये बक्षीस मिळवा...! अशी चर्चा तालुक्यातील जनतेत आहे.
====================================
टिप्पण्या