इंदापूर:पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज विषेश बैठक आयोजित केली होती, या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाडे उपस्थित होते,यावेळी संजय भैय्या सोनवणे यांनी,राजीनामा देऊ नये म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे पण उपस्थित होते,
या बैठकीत संजय भैय्या सोनवणे यांना पक्षात काहीजन काम करताना अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे सोनवणे यांच्या पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले कवाडे यांनी पुर्ण विषय समजून घेऊन सोनवणे यांना असे सांगितले की तुम्ही पक्षाचे महत्वाचे नेते आहात तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आणि आम्ही तो स्विकारणार नाही, इथुन पुढे तुमच्या कामात कोणीही हस्तक्षेप करणार नाही.
तुमचे काम अतिशय चांगले चालले आहे, इथुन पुढे पण पक्षाचे काम आपण जोमाने सुरू ठेवावे, असे सोनवणे यांना सांगितले या वेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे संजय सोनवणे यांनी राजीनामा देऊ नये म्हणून आजच्या मिटिंगसाठी उपस्थित होते, पुणे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष लखन भंडारे,सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे,रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन तांबे हे सगळे युवा आघाडीचे अध्यक्ष उपस्थित होते,पंढरपूर तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव,माढा तालुका अध्यक्ष विनोद सरवदे, महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते मंडळींनी संजय सोनवणे यांनी राजीनामा देऊ नये यासाठी प्रयत्न केले,हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून व सॅनिटायझर, मास्कचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या