इंदापूर: मंगळवार दिनांक 6.4.2021 रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये इंदापूर नगर परिषदेच्या वतीने प्रभागातील नागरिकांना कोरोणा रक्षण लसीकरण करून घेणे बाबत व सदर आजार होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती होणेबाबत इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा आरोग्य विभाग सभापती श्री.अनिकेत वाघ, वीज व वृक्ष संवर्धन सभापती,सौ.सुवर्णा मखरे, नगरसेवक प्रशांत सिताप यांनी घरोघरी जाऊन प्रभागातील नागरिकांची विचारपूस करत त्यांना आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे व सुरक्षा घेणे विषयी मार्गदर्शन केले
तसेच ज्या घरांमध्ये वय वर्ष 45 च्या पुढील व्यक्ती आहेत त्यांनी कोरोना व्यक्तींनी लस घेतली आहे का? घेतली नसल्यास लवकरात लवकर आपले नाव उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे नोंदणी करून लसीकरण करून घेण्यास विनंती केली लसीकरण करण्यास घाबरू नका उलट लसीकरण केल्यास कोरोनाव्हायरस पासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होऊन आपल्या जीवितास धोका निर्माण होणार नाही.
आपण सुरक्षित राहू तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे आदेशांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. मुकुंद शेठ शहा, सामाजिक कार्यकर्ते नितीन मखरे,अधीक्षक श्री.गजानन पुंडे, आरोग्य निरीक्षक श्री.लिलाचंद पोळ, वॉर्ड ऑफिसर श्री.मोहन ढोबळे, श्री.राजू भानवसे, श्री.दशरथ क्षिरसागर , अल्ताफ पठाण ,श्री भागवत मखरे, श्री अशोक चिंचकर व सुधीर पारेकर हे कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या