बारामती : - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख 'आरोग्य दूत' मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती तालुका उपसमन्वयक प्रवीण सोनू माकर यांच्या पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी गोजुबावी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत सरस्वती पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याचबरोबर आरोग्य उपकेंद्र गोजुबावीच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. नयनेश मुंडे यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा आणि डोळ्यांची तपासणी केली. गरजूंना आवश्यक औषधोपचार व गोळ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंगेश चिवटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चिवटे यांच्या कार्यप्रेरणेतून होत असलेल्या या उपक्रमाचे ग्र...
SHIVSRUSTHI NEWS