निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाची खंडाळा येथील कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला भेट -कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट उभारणीचे नियोजन-हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/26 देशामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल घडून येत आहे. या बदलाला अनुसरून शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट (C.N.G. PLANT) उभारणीचे नियोजन सूरू केले आहे. यास अनुसरून कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे समवेत संचालक मंडळाने अहिरे, ता. खंडाळा येथील राज प्रोसेसच्या कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला रविवारी (दि. 25) भेट देऊन पाहणी केली. निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच नेहमीच काळजी गरज ओळखुन सातत्याने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलेले आहे, त्यानुसार कारखान्याचे कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) उत्पादनाचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कॉम्प्रेसर बायोगॅस प्लॅन्ट पाहणी प्रसगी दिली. ...