मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

इंदापूर ते पुणे एसटीचा ‘ढाबा’ प्रवास: प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी प्रशासनाचे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष..!

इंदापूर   (विशेष बातमी प्रतिनिधी)इंदापूर ते पुणे प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या बस आता अधिकृत बसथांब्यांवर न थांबता चक्क 'बेकायदेशीर' हॉटेल आणि ढाब्यांवर थांबवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी एसटी आता चहा-पाणी आणि जेवणाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असून, यामागे काहीतरी 'दाल में काला' असल्याची चर्चा प्रवाशांमधून रंगली आहे. अधिकृत बोर्डाचे नाटक कशासाठी..?  एका बाजूला अधिकृत बसथांब्याचे फलक लावून तिथेच गाड्या थांबवण्याचा दिखावा केला जातो, तर दुसरीकडे मात्र बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये वळवली जाते. हे कशाचे द्योतक आहे? या खासगी हॉटेल आणि ढाब्यांना एसटी बसेस थांबवण्याची अधिकृत परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे? गाड्यांची मर्यादा किती? संबंधित ढाब्यावर दिवसाला नेमक्या किती बसेस थांबवण्याची परवानगी देण्यात आली आहे? दरपत्रकाचे काय झाले? परवानगी देताना हॉटेल किंवा ढाबा चालकांना एसटी प्रशासनाने कोणतेही दरपत्रक (Rate Card) दिले होते का?  एफडीए सुस्त, हॉटेल चालक मालामाल सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांची...

जिद्द सोडू नका, यश तुमचेच असेल ! नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश..!

इंदापूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष मा. श्री. भरतभाऊ शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दहावीचा निकाल हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून, यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.नगराध्यक्ष भरतभाऊ शहा म्हणाले की, "दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या कष्टाचे फळ आज तुम्हाला मिळाले आहे. इंदापूरच्या मातीतील मुलांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली, याचा सार्थ अभिमान वाटतो."अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर: 'खचून न जाता फिनिक्ससारखी झेप घ्या' जे विद्यार्थी या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत किंवा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी नगराध्यक्षांनी अत्यंत सकारात्मक आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की: निकाल तुमच्या मनासारखा लागला नसेल, तर खचून ...

अनाथांचा' कॅप्टन! इंदापूरचे धरमचंद गिरीधारीलाल लोढा 'अनाथ सेवा' क्षेत्रातील 'राज्यस्तरीय रत्न' पुरस्कार..! प्रधान

इंदापूर :- आपल्या आगळ्यावेगळ्या 'समाज सेवेच्या' शैलीसाठी प्रसिद्ध असलेले माननीय श्री. धरमद गिरधारीलाल लोढा यांनी पुन्हा एकदा 'मोठा धमाका' केला आहे. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे, आणि तेही त्यांच्या 'अनाथ सेवा' क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी!आपली 'अनाथ सेवा' फक्त नावापुरती मर्यादित न ठेवता, ती 'कृती'तून कशी उतरवायची, हे लोढा पप्पा यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाने आणि अनाथांच्या मनातील 'आनंद' फुलवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना हा सन्मान मिळवून दिला आहे. पुरस्कार स्वीकारताना लोढांचा 'तो' आत्मविश्वासाने भरलेला फोटो पाहून अनेकांना त्यांच्या सेवेची खरी 'ताकद' समजली. या पुरस्कारामुळे केवळ लोढा पप्पा नाही, तर संपूर्ण 'इंदापूर' तालुक्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली गेल्याने आता इंदापूरचे नाव 'समाज सेवा' क्षेत्रातही आदराने घेतले जाईल. अनाथांच्या 'मदत'साठी नेह...

इंदापूर नगरीत घुमणार 'शिवशंभो गर्जना'! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य लोककला मैफिल

इंदापूर: स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर नगरीत एका ऐतिहासिक आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अभिजीत जाधव आणि अमु जाधव यांचा 'अभि-अमु लाईव्ह' हा गाजलेला **मराठी लोककला संगीताचा  कार्यक्रम प्रथमच इंदापूरकरांच्या भेटीला येत आहे.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी  कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांच्या पराक्रमाचा जागर करण्यासाठी 'शिवशंभो गर्जना' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रणवाद्यांच्या घोषात आणि शाही सुरांच्या साथीने संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येईल.प्रमुख कलाकार,अभिजित जाधव आणि अमु जाधव (अभि-अमु लाईव्ह) दिनांक शुक्रवार, १५ मे २०२६ वेळ सायंकाळी ठीक ०७:०० वाजता स्थळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, आय कॉलेज समोर, इंदापूर.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांचा जागर, रणवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला आपण सर्व इंदापूरकर नागरिक आमंत्रित आहात!"महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला हा जबरदस्त कार्य...

सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित

इंदापूर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पुण्यात संपन्न झाला. यामध्ये वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंदापूर येथील 'वृक्ष संजीवनी परिवारा'च्या सौ. सायरा हमीद आत्तार यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण पुणेआयोजक राष्ट्रभक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य सन्मानित व्यक्ती सौ. सायरा हमीद आत्तार (वृक्ष संजीवनी परिवार, इंदापूर) पुरस्काराचे नाव राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रमुख पाहुणे/हस्ते प्रदान सौ. भारतीताई तूपे आणि राजेंद्र पवार सध्याच्या वाढत्या तापमानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केल्यास मानवाला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने 'एक व्यक्ती, एक झाड' ही संकल...

इंदापूरचे विकास खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' प्रदान

 इंदापूर  १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यात आयोजित राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात, इंदापूर येथील श्री. विकास पांडुरंग खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ३ मे रोजी हा शानदार सोहळा पार पडला. श्री. विकास खिलारे यांना हे सन्मान 'रक्तदान चळवळ' या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३५ वेळा रक्तदान करण्याचा विक्रम नोंदवला आहे. तसेच, वर्षातून किमान २ वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यांचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय भक्ती संघटना महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक श्री. राजेंद्र श्रीरंग पवार (कार्याध्यक्ष, राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र) आणि व्यवस्थापन विजेते मीडिया यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंदापूर चे उद्योगपती धरमचंद लोढा उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण सोहळ्याबद्दल परिसरामध्ये श्री. खिलारे यांचे अभिनंदन होत आहे.

कु.तनिष्का किशोर राऊत श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर सायन्स महाविद्यालय इंदापूर येथील कु.तनिष्का किशोर राऊत (परीक्षा क्रमांक -P049421) ही विद्यार्थिनी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तसेच पुणे जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम आली आहे.तिला मराठी विषयात ९८ गुण मिळाले आहेत.मराठी विषयाच्या शिक्षिका प्रा.सौ.मीना कैलास कदम यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.वर्गशिक्षक श्री.सहदेव म्हस्के व मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे यांनी तिचे अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी विद्यालयाचे नावलौकिक झालेबद्दल विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.