इंदापूर १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुण्यात आयोजित राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात, इंदापूर येथील श्री. विकास पांडुरंग खिलारे यांना 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ३ मे रोजी हा शानदार सोहळा पार पडला.
श्री. विकास खिलारे यांना हे सन्मान 'रक्तदान चळवळ' या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ३५ वेळा रक्तदान करण्याचा विक्रम नोंदवला आहे. तसेच, वर्षातून किमान २ वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यांचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय भक्ती संघटना महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक श्री. राजेंद्र श्रीरंग पवार (कार्याध्यक्ष, राष्ट्रभक्ती संघटना महाराष्ट्र) आणि व्यवस्थापन विजेते मीडिया यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इंदापूर चे उद्योगपती धरमचंद लोढा उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याबद्दल परिसरामध्ये श्री. खिलारे यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या