इंदापूर:
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर नगरीत एका ऐतिहासिक आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अभिजीत जाधव आणि अमु जाधव यांचा 'अभि-अमु लाईव्ह' हा गाजलेला **मराठी लोककला संगीताचा कार्यक्रम प्रथमच इंदापूरकरांच्या भेटीला येत आहे.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांच्या पराक्रमाचा जागर करण्यासाठी 'शिवशंभो गर्जना' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रणवाद्यांच्या घोषात आणि शाही सुरांच्या साथीने संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येईल.प्रमुख कलाकार,अभिजित जाधव आणि अमु जाधव (अभि-अमु लाईव्ह) दिनांक शुक्रवार, १५ मे २०२६ वेळ सायंकाळी ठीक ०७:०० वाजता स्थळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, आय कॉलेज समोर, इंदापूर.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांचा जागर, रणवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला आपण सर्व इंदापूरकर नागरिक आमंत्रित आहात!"महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला हा जबरदस्त कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या