कु.तनिष्का किशोर राऊत श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर सायन्स महाविद्यालय इंदापूर येथील कु.तनिष्का किशोर राऊत (परीक्षा क्रमांक -P049421) ही विद्यार्थिनी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व सायन्स महाविद्यालयात बारावीत ८७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.तसेच पुणे जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम आली आहे.तिला मराठी विषयात ९८ गुण मिळाले आहेत.मराठी विषयाच्या शिक्षिका प्रा.सौ.मीना कैलास कदम यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.वर्गशिक्षक श्री.सहदेव म्हस्के व मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे यांनी तिचे अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी विद्यालयाचे नावलौकिक झालेबद्दल विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या